Latest

वयाच काय घेवून बसलाय, फक्‍त जिगर पाहिजे…वय वर्ष १०७, दोन सुर्वणपदकांवर मोहोर!

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : वयाची शंभरी ओलांडल्‍यानंतर एखाद्या स्‍पर्धेत सहभागी हो‍णे आणि यामध्‍ये पदक पटकावणे, हे वाक्‍य ऐकलं तरी आपण सारेच आवाक होतो. मात्र ही जिगरीबाज कामगिरी केली आहे हरियाणातील १०७ वर्षांच्‍या रामबाई यांनी. वय हे केवळ आकडे असतात, हे वाक्‍य त्‍यांनी मागील चार वर्ष वारंवार सिद्ध केले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्‍या सातत्याने पदक जिंकत आल्‍या आहेत.  ( Dadi Rambai Won 2 Gold Medal In National Master Athletics Championship )

रामबाई चरखी या दादरी जिल्ह्यातील सर्वात वृद्ध महिला आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्‍या सातत्याने सुवर्णपदके जिंकत आहेत. दोहती शर्मिला यांच्‍यामुळे त्‍यांनी चार वर्षांपूर्वी क्रीडा क्षेत्रात प्रवेश केला. आत्तापर्यंत त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ५० पदके जिंकली आहेत. आठवडाभरात त्यांनी दोन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाच सुवर्णपदके जिंकली आहेत. ( Dadi Rambai Won 2 Gold Medal In National Master Athletics Championship )

रामबाईंच्‍या दोन्‍ही मुलीही खेळाडू

रामबाईंप्रमाणेच त्यांच्या मुली सुंदर देवी (वय ७०) आणि संतरा देवी (वय ६५) याही खेळाडू आहेत. या दोघांनीही राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके पटकावली आहेत. त्यांची मुलगी संत्रा देवी यांची मुलगी शर्मिला देवी (वय ४०) याही ॲथलीट आहेत. बहुतेक स्पर्धांमध्ये रामबाई आपल्या मुली आणि नातीसोबत सहभागी होण्यासाठी येतात. रमाबाईंचे कुटुंब क्रीडा क्षेत्रात प्रेरणास्त्रोत ठरले आहे. ( Dadi Rambai Won 2 Gold Medal In National Master Athletics Championship )

नेपाळ आणि मलेशियामधील स्पर्धांमध्येही सुवर्णपदक

रामबाई यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही आपली छाप सोडली असून देशासाठी चार सुवर्णपदके जिंकली आहेत. नेपाळमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या 100 आणि 200 मीटर शर्यतीत त्यांनी सुवर्णपदक जिंकले. याशिवाय मलेशियामध्ये झालेल्या 100 आणि 200 मीटर शर्यतीतही सुवर्णपदक पटकावले आहे.

Dadi Rambai ठरल्‍या स्‍पर्धेच्‍या प्रेरणास्त्रोत

शुक्रवार,९ फेब्रुवारी रोजी तेलंगणामध्‍ये पाचव्‍या राष्‍ट्रीय मास्‍टर ॲथलेटिक्‍स चॅम्पियनशिप स्‍पर्धा पार पडली. यामध्‍ये हरियाणातील चरखी दादरी जिल्ह्यातील कदमा येथील रहिवासी असलेल्‍या १०७ वर्षांच्‍या रामबाई सहभागी झाल्‍या. या स्‍पर्धेत सहभागी झालेल्‍या २५०० खेळाडूंसाठी रामबाई हा प्रेरणास्त्रोत ठरल्‍या. त्‍याचा फोटो, वय आणि कर्तृत्व दाखवणारे बॅनरही क्रीडांगणात नियमित लावले गेले.

Dadi Rambai यांच्‍या आरोग्‍याचे रहस्‍य

रामबाई यांचे वय १०७ वर्ष आहे. आजही त्‍या क्रीडा स्‍पर्धांमध्‍ये भाग घेत पदके जिंकत आहेत. नियमित चालणे आणि घरी शिजवलेले अन्न हे रामबाईंच्या आरोग्याचे रहस्य आहे. तूप, दही आणि रोटी याच्‍यासह सकाळी आणि सायंकाळी अर्धा किलो दूधाचे सेवन करतात. त्‍याचबरोबर सकाळ आणि सायंकाळी दोन्‍ही वेळा शेतात फिरायला जातात. ( Dadi Rambai Won 2 Gold Medal In National Master Athletics Championship )

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT