Latest

Militants Killed : काश्मीर खोऱ्यात ५ महिन्यांमध्‍ये १०० दहशतवाद्यांना कंठस्नान : ‘लष्कर-ए-तोयबा’ला दणका

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू – काश्मीर खोऱ्यात २०२२ मध्ये झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत १०० दहशतवादी ठार (Militants Killed) झाले आहेत. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी ही कामगिरी केवळ ५ महिने १२ दिवसांत केली आहे, अशी माहिती काश्मीर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी आज (सोमवार) दिली.

विजय कुमार म्हणाले की, काश्मीर खोऱ्यात मागील पाच महिन्‍यांमध्‍ये वेगवेगळ्या चकमकीत आतापर्यंत १०० दहशतवादी ठार झाले आहेत. २०२२ मध्ये ५ महिने आणि १२ दिवसांत ७१ स्थानिक आणि २९ परदेशी दहशतवादी वेगवेगळ्या चकमकीत मारले गेले आहेत. २०२१ मध्ये याच कालावधीत ५० दहशतवादी (४९ स्थानिक आणि १ विदेशी) मारले (Militants Killed) गेले होते, असेही त्यांनी सांगितले.

या कारवाईत लष्कर-ए-तोयबाला दणका बसला आहे. तोयबाचे ६३ दहशतवादी मारले गेले आहेत. तर जैश-ए-मोहम्मद या संघटनेचे २४ दहशतवादी चकमकीत ठार झाले आहेत, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले

जम्मू आणि काश्मीर पोलीस सुरक्षा दलांसह काश्मीरमध्ये अनेक दहशतवादविरोधी कारवाया करत आहेत. अनेक दहशतवादी आणि त्यांचे कमांडर मारले गेले आहेत. गृह मंत्रालयाच्‍या सूत्रांनी  सांगितले की, केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध सक्रिय ऑपरेशनसह एक मजबूत सुरक्षा आणि गुप्तचर ग्रीडची स्थापना केली आहे. त्यामुळे जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. दहशतवादी कारवाया आणि सीमेपलिकडून दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT