नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
देशाचे तत्कालीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचे बंधू कर्नल विजय रावत हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी येथे दिली. अलीकडेच कर्नल विजय रावत यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांची भेट घेऊन राजकारण प्रवेशावर चर्चा केली होती. डेहरादून येथे रावत यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.
आमच्या कुटुंबाची विचारधारा भाजपशी मिळतीजुळती आहे. या पार्श्वभूमीवर आपण भाजपसाठी काम करू इच्छितो, असे विजय रावत यांनी एका खाजगी दूरचित्रवाणीशी बोलताना सांगितले होते. पक्षाने सांगितले तर आपण निवडणुकीच्या मैदानातही उतरू, असेही रावत यांनी नमूद केले होते. विजय यांचे बंधू सीडीएस बिपीन रावत यांचे 8 डिसेंबर रोजी तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत अपघाती निधन झाले होते. त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह अन्य बारा लोकांचाही या अपघातात मृत्यू झाला होता.
हेही वाचलं का?