Latest

लता-आशा : जेव्‍हा आशा म्‍हणाल्‍या…’लतादीदी तुझे सूर कच्‍चे लागले’

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : लता मंगेशकर आणि आशा भोसले दोघीही सख्ख्या बहिणी. दोघीची दिग्गज गायिका. पण, त्यांच्यामध्ये गायिकीवरून कधीच स्पर्धा झाली नाही. वैयक्तिक मतभेद विसरूनही दोघी आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेल्या. त्या दोघींच्या असंख्य आठवणी आहेत. आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्या गायकीचा एक किस्साही सांगितला जातो. तर लता यांनी एका मुलाखतीत आशासोबतचं आपलं नातं कसं आहे, याविषयी बातचीत केली होती.

आशा-लता यांचा अविस्मरणीय प्रसंग

आशा भोसलेंनी एका सिंगिंग रिॲलिटी शोमध्‍ये प्रमुख पाहुण्‍या म्हणून उपस्‍थिती लावली होती. त्‍यावेळी त्‍यांनी लतादीदींबद्‍दलच्‍या काही आठवणी शेअर केल्‍या होत्‍या. आशाजी म्‍हणाल्‍या, 'मी आणि दीदी जेव्‍हा रेकॉर्डिंग करायला जात होतो, तेव्‍हा खूपच सिंपल कॉटनची साडी नेसून, हातात काचेच्‍या बांगड्‍या घालून जायचो. आमचं संपूर्ण लक्ष फक्‍त गाण्‍याकडे असायचं.' यावेळी आणखी एक प्रसंग त्‍यांनी सांगितला होता. आशाजी म्‍हणाल्‍या होत्या-'१० वर्षांपूर्वी माझ्‍या दीदीने एक गाणे गायले होते. त्‍यावेळी मी दीदीला म्‍हणाले की, दीदी तुझा आवाज ठिक वाटत नाहीये आणि तुझे सूर कच्‍चे वाटत आहेत. त्‍यावेळी दीदी म्‍हणाल्‍या, अच्‍छा, असयं? तुला जास्‍त माहिती आहे…' दुसर्‍या दिवशी लतादीदी सकाळी-सकाळी तानपुरा घेऊन रियाज करायला बसल्‍या आणि त्‍यानंतर तेच गाणं मला पुन्‍हा गाऊन दाखवलं. त्‍यांचा हा रियाज म्‍हणजे संगीताप्रती असलेलं समर्पण आहे.'

बहिणी-बहिणींची जवळीकता

लता यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं- आशा आणि मी खूप जवळ आहोत. आम्ही सध्या फार भेटत नाही. कारण आशा आपला मुलगा आनंदसोबत खूप दूर राहते. आधी ती माझ्या घराशेजारी राहायची. आणि येथे आम्ही दोन अपार्टमेंट्सच्या मधील दरवाजादेखील प्रभुकुंजमध्ये शेअर करत होतो. मी जाणते की, लोकांना यावर विश्वास करणं कठीण होतं. पण, हे असंच आहे. हो, आमच्या भूतकाळात काही मतभेद होते. पण, बहिण-भावांमध्ये मतभेद होणं स्वाभाविक आहे. तिने आपल्या तरुणपणी अशा गोष्टी केल्या होत्या, ज्या मला मंजूर नव्हत्या.

जेव्हा लता यांना विचारण्य़ात आलं होतं की, 'तुमचा अर्थ आशा यांनी कमी वयात लग्न केलं म्हणून आहे का? यावर लता यांनी उत्तर दिलं की, "हो, मी जाणते. ते जरा लवकरचं होतं. मला वाटत होतं की, ही खूप वाईट पद्दतीने संपुष्टात येईल आणि तसचं झालं. हे तिचं जीवन होतं. तिला जे आवडायचं, ती त्यासाठी स्वतंत्र होती. आमच्या कुटुंबात आम्ही कधीही कुणाच्याही निर्णयावर प्रश्न उपस्थित करत नाही."

यानंतर लता यांना विचारण्यात आलं होतं की, त्या प्रोफेशनल क्षेत्रात दोन्ही बहिणींतील स्पर्धेविषयी काय विचार करता? यावर लता म्हणाल्या होत्या की, "आमच्या दोघींमध्ये कधीही प्रोफेशनल स्पर्धा नव्हती. तिने तिची गायनाची वेगळी शैली विकसित केली. जे ती करू शकते, ते मी नाही करू शकत. पंचम (आरडी बर्मन) सोबत मी जी गाणी गायली, ते आशा द्वारा पंचमसाठी गायलेल्या गाण्यांपेक्षा अगदी वेगळी होती.मी 'कटी पतंग'मध्ये पंचमसाठी 'ना कोई उमंग है' गाणं गायलं होतं. मी या चित्रपटामध्ये 'मेरा नाम है शबनम' गाणे कधी गाऊ शकत नव्हते. ते गाणे केवळ आशाचं गाऊ शकते. आशा आणि मी एकत्र वास्तवमध्ये गाणी एन्जॉय केली. आमच्या दोघींमध्ये कधीच स्पर्धा नव्हती. मी नेहमी तिच्यासाठी चांगली कामना केली. आणि मला नेहमी तिने मोठ्या बहिणीच्या रूपात पाहिलंय.

हेही वाचलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT