hruta durgule  
Latest

Timepass 3 : हृता दुर्गुळे म्हणते-शूटिंग करताना भाषेसाठी तारेवरची कसरत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : रवी जाधव दिग्दर्शित फ्रँचाईझीमध्ये हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परब यांच्या भूमिका असलेला सिनेमा टाईमपास ३ चा समावेश आहे. या सिनेमाचे १६ सप्टेंबर रोजी झी ५ वर प्रीमियम होणार आहे. प्रथमेश आणि हृता दोघेही मुख्य भूमिकेत आहेत. ३६ टक्के मिळवून बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर दगडू (प्रथमेश परब) कॉलेजविश्वात पाऊल टाकतो आणि मग पुढे काय होतं हे या सिनेमात पाहायला मिळणार आहे. गुंड म्हणून आपला भूतकाळ मागे टाकून नवी सुरुवात करण्याचा दगडूचा निश्चय त्याच्या भोवती असलेल्या लोकांमुळे पणाला लागतो.

आपण कधीच बदलणार नाही असं त्याला वाटायला लागतं, मात्र तरीही पुढे जात राहाण्याचं बळ त्याला मिळतं, कारण तो एका गँगस्टरच्या मुलीच्या- पालवीच्या (हृता दुर्गुळे) प्रेमात पडतो. दगडूच्या सुसंस्कृत वागण्यानं पालवी प्रभावित होते. मात्र सगळ्याच चांगल्या गोष्टी कधी ना कधी संपतात या न्यायाने दगडूचं हा उसना अवतारही संपतो. त्यामुळे दगडू- पालवीच्या नात्यावर काय परिणाम होतो हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.

सिनेमाविषयी हृता दुर्गुळे म्हणाली, 'या सिनेमात काम करताना माझ्यासमोर एकच आव्हान होतं आणि ते म्हणजे, भाषेचं. पालवी ज्या टोन किंवा लहेजामध्ये बोलते ते माझ्यासाठी सोपं नव्हतं. शूटिंगचा पहिलाच दिवस माझ्यासाठी खूप अविस्मरणीय होता, विशेषतः पालवी म्हणून मी जेव्हा तयार झाले तो क्षण मी कधीही विसरणार नाही. तो सगळाच अनुभव माझ्यासाठी मजेदार आणि वेगळा होता.'
टाईमपास ३ मध्ये संजय नार्वेकर, भाऊ कदम, वैभव मांगले प्रमुख भूमिकेत आहेत. पूर्णपणे कौटुंबिक मनोरंजनाचा अनुभव देणाऱ्या या सिनेमाला विनोद आणि रोमान्सचाही तडका देण्यात आला आहे.

हेदेखील वाचा- 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT