Latest

Pune Crime news : पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर कोयता हल्ला करणाऱ्याला जामीन

अमृता चौगुले

पुणे : पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात जून महिन्यात एकतर्फी प्रेमातून झालेल्या हल्ला प्रकरणात मोठी घडामोड समोर येत आहे. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. या हल्ला प्रकरणातील आरोपीला सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी जामीन मंजूर केला आहे. शंतनू लक्ष्मण जाधव (वय 21, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) असं आरोपीचं नाव आहे.

पुण्यातील गर्दीच्या ठिकाणी सदाशिव पेठेत भररस्त्यात त्याने तरुणीवर पळत जात हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे या तरुणाने प्रसंगावधान दाखवल्याने या तरुणीवरचा मोठा अनर्थ टळला होता. शंतनू जाधव या तरुणाने ॲड. अभिषेक हरगणे, ॲड. स्वप्नील चव्हाण, ॲड. ओंकार फडतरे यांच्यामार्फत जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. कारागृहातून जामीन मिळवून बाहेर पडल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी बोलाविल्यानंतर उपस्थित राहणे, पासपोर्ट जमा करणे या अटींवर जाधव याचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.

सदाशिव पेठेत भररस्त्यात हल्ल्याचा थरार

पुण्यातील प्रसिद्ध ठिकाण असलेले सदाशिव पेठे पेरुगेट पोलीस चौकीजवळ तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. या घटनेने पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. सर्वांनीच या घटनेचा राज्यभरातून संताप व्यक्त केला जात होता. मात्र एका तरुणाच्या प्रसंगावधानामुळे ती थोडक्यात बचावली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती . याप्रकरणी पोलिसांनी शंतनू जाधव या तरुणाला ताब्यात घेत जाधवच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT