purva shinde 
Latest

Purva Shinde : ‘लागिरं झालं जी’च्या ‘जयडी’नं लावला ग्लॅमरचा तडका❤️

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

छोट्या पडद्यावरील लागीरं झालं जी या मालिकेतील जयडी तुम्हाला आठवत असेल ना? ही जयडी म्हणजेच अभिनेत्री पुर्वा राजेंद्र शिंदे (Purva Shinde) आहे. तिने लागीर झालं जी या मालिकेत जयडी (नवी जयडी) ची भूमिका साकारली होती. या मालिकेतील पुर्वाच्या या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलंय. पुर्वाच्या (Purva Shinde) इन्स्टाग्रामवर तिने नवे फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही की, जयडी रिअल लाईफमध्ये इतकी ग्लॅमरस आहे.

तिने युवा डान्सिंग, टोटल हुबलाक, चला हवा येऊ द्या (लेडीज झिंदाबाद), तुझं माझं जमतंय, आई माझी काळुबाई, जीव माझा गुंतला, घेतला वसा टाकू नको या कार्यक्रमांमध्ये काम केलं आहे. पूर्वा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

'लागिर झालं जी' ही लोकप्रिय मालिका ठरली होती. जयडीची या मालिकेतील भूमिकाही गाजली होती. जयडी ही खूप सुंदर आहे आणि रिअल लाईफमध्येही तितकीच ग्लॅमरसही आहे. या मालिकेतील अजिंक्य, शीतल, मामी, जिजी यांच्याही भूमिका गाजल्या होत्या.

पुर्वा खूपच ग्लॅमरस

पुर्वा शिंदेची सोशल मीडियावर खूप चर्चा होतेय. पुर्वा शिंदेने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या नवनव्या फोटोशूटमुळे तिची चर्चा होत असते. पुर्वा सामान्य कुटुंबातील आहे. तिचे अनेक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तिचे हॉट फोटोशूट सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. आता तिने नवे फोटोशूट केले आहे.

पुर्वाचा जन्म १६ मे, १९९७ रोजी पुणे येथे झाला. तिचे शिक्षण रेणुका स्वरूप गर्ल्स हायस्कूल, पुणे येथे झालं. पुढे तिने सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स बॅचलर पदवी घेतली. ती केवळ उत्तम अभिनेत्रीच नाही तर एक सुंदर नृत्यांगनादेखील आहे. झी युवा वाहिनीवरील 'युवा डान्सिंग क्वीन' या शोमध्ये ती सहभागी झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT