kriti-shahid  
Latest

Teri Baaton Me Aisa Uljha Jiya Booking : शाहिद-क्रितीच्या चित्रपट रिलीज आधी कोटींची कमाई

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहिद कपूर पुन्हा एखदा रोमँटिक चित्रपटाच्या प्रवासावर आहे. तेरी बातों में ऐसा उलझा जिया या चित्रपटात शाहिद आणि क्रिती सेनॉन यांच्या भूमिका आहेत. (Teri Baaton Me Aisa Uljha Jiya Booking ) चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग दोन दिवस आधी सुरू झाले आहे. शाहिद कपूर आणि  क्रिती सेनॉन स्टारर तेरी बातों में ऐसा उलझा जिया चित्रपटाने रिलीजच्या आधी कोटींची कमाई केली आहे. (Teri Baaton Me Aisa Uljha Jiya Booking )

संबंधित बातम्या – 

जर्सीच्या रिलीजच्या दो वर्षांनंतर पुन्हा एकदा शाहिद कपूर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. चित्रपटाच्या पडद्यावर त्याची रिलीज लास्ट ब्लॉकबस्टर 'कबीर सिंह' चित्रपट होता. संदीप रेड्डी वांगाच्या चित्रपटानंतर आता शाहिदला चित्रपट 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' तून चांगली कमाईची अपेक्षा आहे. या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग मंगळवारी सहा फेब्रुवारी रोजी सुरू झाली होती. ॲडव्हान्स बुकिंग कमाईमध्ये दोन दिवसांच्या आता या चित्रपटाने कोटी रुपयांची कमाई केली आहे.

शाहिद कपूर आणि कृती सेनॉन स्टारर चित्रपट 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' एक रोमँटिक चित्रपट आहे. हा चित्रपट इतर सिनेमांपेक्षा हटके आहे. दिनेश व्हिजन मॅडॉक प्रोडक्शनमध्ये तयार झालेल्या चित्रपटांमध्ये पहिल्यांदा प्रेक्षकांना क्रिती सेनॉन (Kriti Sanon) आणि शाहिद कपूरची एक फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT