पुणे : पुण्यात कोयता गँगच्या टोळक्यांचा धुडगूसचे सत्र सुरूच आहे. सहकारनगर भागातील तळजाई पठार परिसरात टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा काल मध्यरात्री टोळक्याने दहशत माजवून अरण्येश्वर भागात वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटनेत वाहन मालकांचं मोठं नुकसान झालं आहे. शहरातील अरण्येश्वर भागात टोळक्याने दहशत माजवून मध्यरात्री दहा ते पंधरा वाहनांची ताेडफोड करून घरांवर दगडफेक केली. तोडफोड करणाऱ्या गुंडांनी घरांवर दगडफेक केल्याने नागरिकांमध्ये घबराट उडाली.
पुण्यातील अरण्येश्वर भागात ही घटना घडली असून हा परिसर सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो. यापूर्वीही याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा वाहन तोडफोडीची आणखी एक घटना घडल्यामुळे सहकारनगर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. या तोडफोडीच्या घटनेप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा