कोपरगाव : तालुक्यातील सुरेगाव सोसायटीची निवडणूक आमदार आशुतोष काळे यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. त्यावेळी टीकेचाही प्रयत्न झाला होता. बिपीनराव कोल्हे यांच्या विचारांच्या 50 ते 60 सभासदांच्या मतदानाचा हक्क हिरावला. मात्र, सभासदांनी या सर्व भूलथापांना चपराक देत जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सुरेगाव सोसायटीच्या निवडणुकीत कोल्हे गटाच्या जनसेवा प्रणित विकास पॅनलने घवघवीत यश संपादन करून सर्व तेरा जागेवर विजय प्राप्त केला आहे. यावेळी आमदार काळे व परजणे गटाचा धुव्वा उडविला आहे.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक विलासराव वाबळे व माजी संचालक मोहन वाबळे यांनी विजयात मोलाची कामगिरी बजावली आहे. विजयी उमेदवारात कोल्हे गटाचे सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे संचालक विलासराव वाबळे, गणेश वाबळे, सर्जेराव वाबळे, पंकज निंबाळकर, प्रशांत वाबळे, राजेंद्र वाबळे, गोरख कदम, सोपानराव कदम, शंकरराव कदम, कुमार मेहेरखांब, कुसुमबाई वाबळे, रंजना कदम, राजेंद्र हळनोर यांचा समावेश आहे, तर कोसाकाचे संचालक राजेंद्र मेहेरखांब, गोदावरी दुध संघाचे संचालक भाउसाहेब कदम, सरपंच शशिकांत वाबळे, गौतम सहकारी बँकेचे संचालक नामदेव कोळपे, जिनींग प्रेसिंगचे संचालक शिवाजीराव वाबळे यांचे सुपुत्र संजय वाबळे यांच्यासह काळे गटाच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे. निवडणुक निर्णय अधिकारी नामदेव ठोंबळ यांनी काम पाहिले.
सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरत त्यानुरूप शेतकर्यांच्या विकासासाठी बिपीनराव कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी प्रयत्न करू,असे विलासराव वाबळे म्हणाले. विजयी उमेदवारांचे बिपीनराव कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे. सभासदांनी गुलालाची उधळण करत हा विजयोत्सव साजरा करण्यात आला.
हेही वाचा: