पनवेल: पनवेल – गोवा महामार्गाचे १७ वर्षांपासून काम रखडले आहे. याच्या निषेधार्थ मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील आज (दि.२७) कोकण जागर यात्रा काढण्यात आली. आज केलेले आंदोलन शांततेत होते. मात्र, या पुढची आंदोलने शांततेत नसतील, असा इशारा अमित ठाकरे यांनी यावेळी दिला. यात्रेची सुरवात पनवेल येथील पळस्पे फाट्यावरून झाली. त्यावेळी ते बोलत होते.
अमित ठाकरे म्हणाले की, १७ वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी आंदोलन करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना देशद्रोही म्हणणार असाल, तर खराब रस्त्यामुळे अपघातात जे मृत्युमुखी पडले, त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना काय म्हणायचं? महामार्गाचा प्रश्न प्रचंड गंभीर आहे. आज आम्ही शांततेत पदयात्रा काढतोय. पण तरीही काही सुधारणा होणार नसेल, तर पुढचं आंदोलन अधिक तीव्र, आक्रमक करू. महाराष्ट्र सैनिक आणि कोकणी माणूस तुम्हाला अनुभवायला मिळेल', असा इशारा ठाकरे यांनी यावेळी दिला. (Amit Thackeray)
मागील १७ वर्षांपासून पनवेल – गोवा महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे कामाचा खर्च वर्षागणिक बदलत जाऊ लागला आहे. सरकारच्या अनास्थेमुळे कोकणातील नागरिकांना मोठा त्रास होऊ लागला आहे.
यावेळी अंकिता यांनी कोकणी सांस्कृतीमधील प्रसिद्ध गाऱ्हाणी गात या महामार्गाची व्यथा सरकार पुढे मांडत सरकारवर टीका केल्या. तळ्यात मळ्यात आणि संगीत खुर्चीचा खेळ आटोपला असेल, तर आमच्या महामार्गाच्या प्रश्नावर लक्ष पडू दे महाराजा, अशा शब्दांत गाऱ्हाणी मांडली. त्यानंतर जागर यात्रेला सुरवात झाली. या वेळी अमित ठाकरे यांच्या सोबत हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी शालिनी ठाकरे, महेश जाधव, गजानन काळे, योगेश चिले, केसरीनाथ पाटील यासह मनसे पदाधिकारी आणि कोकणकन्या अंकिता वालावकर आदी उपस्थित होत्या.
हेही वाचा