धामोड : पुढारी वृत्तसेवा : धामोड ( ता. राधानगरी) येथील तुळशी धरण ९३% भरले असून, धरणातून ५०० क्युसेक्सने विसर्ग सुरु केला आहे, अशी माहिती शाखा अभियंता खंडेराव गाडे यांनी दिली आहे.
राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले असताना तुळशीतून पाणी सोडले असते तर पंचगंगगा नदीची पाणी पातळी वाढून पुराचा धोका वाढला असता. राधानगरी तालुक्यातील पावसाचा जोर कमी झाला असून, राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलीत दरवाजे बंद झाले आहेत. संभाव्य पूर स्थिती टाळण्यासाठी तुळशी धरणातून विसर्ग सुरू केला आहे.
तुळशी धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासात ११२ मि मी पाऊस झाला आहे. आज अखेर २६३५ मि मी पाऊस झाला आहे. धरणामध्ये १४११ क्युसेक्सने पाणी जमा होत असुन, सद्यस्थितीला धरणातून ५०० क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे. पावसाच्या प्रमाणात विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याची माहिती शाखा अभियंता खंडेराव गाडे यांनी दिली आहे.
हेही वाचा :