कोल्हापूर : इस्तंबूल (तुर्की) येथे झालेल्या वरिष्ठ गट आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळणार्या कोल्हापूरच्या खेळाडूंनी चार पदकांची कमाई केली. यात दोन सुवर्ण व दोन रौप्य पदकांचा समावेश आहे. शुभांगी पाटील हिने 52 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली.
जान्हवी सावर्डेकर (मुरगूड) हिने 69 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले. ओंकार वाणी (सुळकूड) याने 83 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. 57 किलो वजनी गटात सोनल सावंत (दर्याचे वडगाव) हिने रौप्यपदक पटकाविले. चौघेही कोल्हापूर पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचे खेळाडू असून, कळंबा येथील लिफ्टर्स जीममध्ये सराव करत आहेत.
त्यांना शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार प्राप्त बिभीषण पाटील, प्रशिक्षक विजय कांबळे, प्रा. प्रशांत पाटील, शिवाजी पाटील, सुनील सावंत, जगदिश सावर्डेकर, राजगोंडा वाणी यांचे मार्गदर्शन लाभले.
हे ही वाचा :