प्रियांका हंकारे यांच्या संशोधनास भारत सरकारचे पेटंट  
Latest

कोल्‍हापूर : रक्तदाब औषध संशोधनास प्रियांका हंकारे यांना भारत सरकारचे पेटंट; उच्च रक्तदाब रुग्णांसाठी संजीवनी

निलेश पोतदार

पन्हाळा ; पुढारी वृत्तसेवा तेलवे (ता. पन्हाळा) येथील व सध्या सावर्डे येथे गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रियांका हंकारे (शिर्के) यांनी पॉलिमेरिक मायसेल ऑफ इझेटिमिब औषध तयार केले आहे. या संशोधनास भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून त्यांना पेटंट बहाल केले आहे.

सध्या कोलेस्ट्रोलची समस्या झपाट्याने वाढत असून, अनेक लोक त्याला बळी पडत आहेत. कोलेस्टेरॉल हा एक मेणासारखा चिकट पदार्थ आहे. जो रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो. त्याची पातळी वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतात. तसेच यामुळे रक्तप्रवाह थांबुन हृदयविकारचा धोका वाढू शकतो. कोलेस्टेरॉल वाढण्यामागे जेनेटिक, खराब जीवनशैली यांसारखी अनेक कारणे असू शकतात.

इझेटिमिब हे मार्केटमध्ये नवीन गुणकारी औषध आहे. परंतु त्याची विद्राव्यता कमी आहे. म्हणून इझेटिमिब पॉलिमेरिक मायसेल बनवून त्यांची विद्राव्यता वाढवली आहे. त्यामुळे सदरचे संशोधन हे औषधनिर्माण शाखेतील एक अत्यंत महत्वाचे कार्य असून, ऊच्च रक्तदाब रुग्णासाठी संजीवनी ठरू शकते.

या संशोधन कार्यास अमोल शिर्के, जयदीप हंकारे तसेच तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य जॉन डिसुझा व प्रा. सुनीता शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे प्रा. सुमेधा बने, प्रा. सुकन्या पाटील, वडील दिनकर हंकारे, आई जयश्री हंकारे यांचे व संपूर्ण परिवाराचे उत्तेजन लाभले. या कार्यासाठी सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखरजी निकम, सचिव महेश महाडिक, प्राचार्य डॉ. बत्तासे, उपप्राचार्य वाघचौरे, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT