पुढारी ऑनलाईन : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस हे आज (दि.१३) कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या तब्येतीच्या कारणास्तव त्यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी (दि. 13) कोल्हापूर दौर्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत तपोवन मैदान येथे 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम सायंकाळी चार वाजता होणार आहे.
पुढे बोलताना केसरकर म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सायनसचा त्रास होत असून, त्यांना पुढचे दोन दिवस विमान प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, असेही केसरकर म्हणाले. या आरोग्याच्या कारणास्तव फडणवीस यांना विमान प्रवास करणे शक्य नाही, त्यामुळेच उपमुख्यमंत्री कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत फडणवीस यांच्याऐवजी चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत, असे देखील केसरकर म्हणाले.
जाहिरतीत काही चुकले असले, तर ते सुधारू असेदेखील शिक्षणमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.