पुढारी ऑनलाईन: जर आपण SBI खातेधारक असाल तर ही बातमी आपल्या कामाची आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. रोख रक्कमेचा व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी नमूद करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी आपल्या नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओटीपी टाकणे अनिवार्य झाले आहे. आता एसबीआय ग्राहक ओटीपी टाकल्याशिवाय पैसे काढू शकत नाहीत. ग्राहकांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवणे हे ओटीपी सुविधा सुरू करण्यामागील मुख्य कारण आहे.
एसबीआयने एटीएममधून पैसे काढताना ओटीपीच्या आवश्यकतेबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. याबाबत बँकेने म्हटले आहे की, 'आमच्या ओटीपी आधारित रोख पैसे काढण्याची सुविधा ही म्हणजे सायबर गुन्हेगारांविरुद्ध केलेले वैक्सीनेशन आहे. आमच्या ग्राहकांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे असे देखील त्यांनी नमूद केले आहे. 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. यानंतर तुम्हाला डेबिट कार्ड पिनसह ओटीपी टाकावा लागेल. त्यानंतर तुम्ही सहज पैसे काढू शकता.
१. एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यासाठी, प्रथम एटीएम मशीनमध्ये कार्ड इन्सर्ट करा.
२. ओटीपी पर्यायावर क्लिक करा.
३. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल, तो टाका.
४. यानंतर एटीएम पिन टाका.
५. पिन टाकल्यानंतर रोख पैसे काढणे शक्य होईल.
हेही वाचा: