Kiara Advani 
Latest

Kiara Advani : कियाराने उलगडले ‘त्या’ केमिस्ट्रीचे रहस्य

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिद्धार्थ मल्होत्राशी विवाहबद्ध होवून वर्ष उलटल्यानंतर कियारा अडवाणीने ( Kiara Advani ) , ती या बंधनात कशी गुंतत गेली, याचा उलगडा केला. कियाराने अलीकडेच एका मुलाखतीत आपण सिद्धार्थच्या प्रेमात कशी पडले व त्याच्या समवेत कशी निश्चित असते, हे सविस्तर विशद केले.

संबंधित बातम्या 

माझ्यासाठी सिद्धार्थसमवेत असणे हेच सर्वस्व आहे. घरातून इतके प्रेम, काळजी, सहकार्य असताना मला त्यामुळे काहीच काळजी नव्हती, काम संपवून घरी पोहोचल्यानंतरही आपले कोणी तरी आहे, ही भावनाच भरपूर होती, आपली काळजी घेणारे कोणी तरी आहे, हे खूप महत्त्वाचे असते. याचा कियाराने यावेळी उल्लेख केला.

सिद्धार्थ व कियारा ( Kiara Advani ०  या जोडीने फेब्रुवारी २०२३ मध्ये राजस्थानमधील एका शानदार विवाह सोहळ्यात प्रेमाच्या आणाभाका घेतल्या, अलीकडेच विवाहाला एक वर्ष पूर्ण होत असताना सिद्धार्थने उभयतांचा एक फोटो शेअर केला आणि हसी तो फसी, असा त्यात उल्लेखही केला. आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत रणवीर सिंगसह 'डॉन-३' मध्ये झळकणार आहे. तिन 'वॉर-२' हा चित्रपट स्वीकारला असल्याचीही कुजबज सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT