नवी दिल्ली : काही काही खाद्यपदार्थांना 'कम्फर्ट फूड' ( comfort food ) म्हटलं जाते. असे अन्न खाल्ले की, आपल्या मेंदूला आराम किंवा शांती मिळाल्याची भावना होते. प्रत्येक देशात संस्कृती आणि वातावरणावर आधारित वेगवेगळे कम्फर्ट फूड असू शकते. याबाबत एक नवे संशोधन करण्यात आले आहे. त्यानुसार भारतात कम्फर्ट फूड म्हणून सहसा लोक भाताची खिचडी खाणे पसंत करतात. अमेरिकेतील लोकांना पिझ्झा खाऊन शांती मिळते!
साऊथ कॅरोलिना युनिव्हर्सिटीत याबाबतचे संशोधन झाले आहे. वेगवेगळ्या वेळी लोक वेगवेगळा आहार घेणे पसंत करीत असतात. ज्यावेळी जीवनात बरीच उलथापालथ होत असते त्यावेळी लोक असे भोजन खाणे पसंत करतात जे त्यांनी यापूर्वी खाल्लेले नसेल. 'टाईम्स ऑफ चेंज'च्या एका अध्ययनात समोर आले की जीवनात स्थैर्य असेल तर लोक लोकप्रिय बँडचे भोजन खाणे पसंत करतात. त्यापासून आपल्याला नव्या शक्यता आजमावून पाहण्यास मदत मिळते. उत्तर अमेरिकेत कम्फर्ट फूडच्या रूपात पिझ्झाला पसंती अधिक मिळते.
कम्फर्ट फूड खाणे स्त्री व पुरुषांच्या मनःस्थितीतही फरक दाखवतो. ( comfort food ) जल्लोषाच्या वातावरणात पुरुषांना कम्फर्ट फूड खाणे आवडते तर महिला ताणतणावाच्या वातावरणात कम्फर्ट फूड खातात. त्यानंतर त्यांना अपराधीपणाची भावनाही सतावते, असे आढळून आले. कम्फर्ट फूड खाल्ल्याने लोक नातेसंबंधांना अधिक अनुभवू लागतात. त्यांच्यामध्ये आपलेपणाची भावना वाढते. अमेरिकेत कम्फर्ट फूड खाल्ल्याने लोकांना सुरक्षित वाटू लागते. अर्थात त्याचे प्रभाव भूतकाळावरही अवलंबून असतात.
हेही वाचा :