Latest

Amritpal Singh : खलिस्तानवादी अमृतपाल ठरतोय भिंद्रानवाले भाग २; पोलिस ठाण्यावर सशस्त्र हल्ला

अमृता चौगुले

अमृतसर; वृत्तसंस्था : आमची जिद्द इंदिराजीही मोडून काढू शकल्या नाहीत. पंतप्रधान मोदी किंवा अमित शहाही ती मोडून काढू शकणार नाहीत, असे वक्तव्य वारीस पंजाब दे या खलिस्तान समर्थक संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याने केलेले आहे. अमृतपाल याच्या हजारो समर्थकांनी गुरुवारी अमृतसरमधील अजनाला पोलिस ठाण्यावर हल्ला केला आणि बंदोबस्तावरील 800 वर पोलिसांच्या समोर अटकेतील आरोपी (अमृतपाल समर्थक लवप्रीत सिंग) सोडवून घेऊन गेले. हल्लेखोरांकडे बंदुका, तलवारी आणि भाले होते. (Amritpal Singh)

अमृतपाल सिंग याला भिंद्रानवालेचा भाग 2 म्हटले जाते. अमृतपाल याचा जन्म अमृतसर जिल्ह्यातील जल्लूपूर खेडा येथे 1993 मध्ये झाला. तो बारावीपर्यंत शिकलेला आहे. 2012 मध्ये दुबईत त्याने ट्रान्स्पोर्ट सुरू केला होता. गतवर्षी दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर वारीस पंजाब दे संघटनेसाठी तो पंजाबला परतला. 26 जानेवारी 2021 रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या दंगलीत दीप सिद्धू मुख्य आरोपी होता, हे येथे उल्लेखनीय! 29 सप्टेंबर 2022 रोजी या संघटनेचा प्रमुख बनला. रोडे या गावात हा कार्यक्रम झाला. खलिस्तानी दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रानवाले रोडे गावचाच रहिवासी होता, हे या आयोजन स्थळाच्या निवडीमागचे औचित्य होते. (Amritpal Singh)

एकीकडे दीप सिद्धू याचा भाऊ मनदीपसिंग सिद्धू मात्र माझा भाऊ दीप हा अमृतपालप्रमाणे फुटीरवादी नव्हता, असे उघडपणे सांगतो. अमृतपाल हा दीप सिद्धूचा नव्हे, तर भिंद्रानवालेचा वारसा चालवतो आहे, असेही म्हणतो. अमृतपालने आपल्या उक्ती आणि कृतीतून ते सत्य आहे, हे सिद्ध केले आहे. पंजाबमधील खलिस्तान समर्थकांवर आमची नजर आहे, या अमित शहांच्या वक्तव्यावर आम्ही खलिस्तानवर बोलू, आम्हाला कुणी रोखू शकत नाही, अशी प्रतिक्रिया अमृतपालने दिली होती. (Amritpal Singh)

कोण होता भिंद्रानवाले ?

  • जर्नेलसिंग भिंद्रानवाले हा 32 हिंदूंना मारण्यासाठी प्रत्येक शिखाला चिथावणी देत असे. यामुळे शिखांचा प्रश्न कायमचा सुटेल, असे तो म्हणायचा.
  • 1982 मध्ये भारताविरोधात सशस्त्र बंड पुकारले. विरोधकांना ठार मारणे सुरू केले. सुरक्षा दलांपासून बचावासाठी तो सुवर्ण मंदिरात 2 वर्षे राहिला. अकाल तख्तवर कब्जा केला.
  • पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जून 1984 मध्ये ऑपरेशन ब्लूस्टार राबवले. भिंद्रानवालेसह 493 दहशतवादी खलिस्तानी दहशतवादी ठार मारले. 83 भारतीय जवान त्यात शहीद झाले.

काय आहे अमृतपाल भाग-2?

  • 1970 च्या दशकात जर्नेलसिंग भिंद्रानवाले या खलिस्तानी दहशतवाद्याचा उदय झाला. तो निळी पगडी घालत असे. अमृतपालही निळी पगड घालतो.
  • भिंद्रानवाले माझी प्रेरणा आहेत. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर मी चालेन. मला त्यांच्यासारखे व्हायचे आहे, असे अमृतपाल उघडपणे बोलतो.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT