Latest

Padma Lakshmi : पद्मा लक्ष्मी बनल्या केरळच्या पहिल्या टान्सजेंडर वकील; बार कौन्सिलमध्ये नोंदणी

अमृता चौगुले

तिरुअनंतपुरम; पुढारी ऑनलाईन : वय किंवा लिंग यावर प्रतिभा अवलंबून नसते. सुशिक्षित सक्षम व्यक्ती समाजात नेहमीच वर्चस्व मिळवतात. प्रतिभावान व्यक्तीवर कोणत्याही परिस्थितीचा परिणाम होत नाही. त्याला फक्त संधी मिळायला हवी. अशाच एका यशस्वी आणि प्रतिभावान व्यक्तीने अनेकांचे तोंडे बंद केली, ज्यांनी कधी काळी या व्यक्तीला हिनवले होते. अशीच कामगिरी पद्मा लक्ष्मी (Padma Lakshmi) यांनी अशीच कामगिरी बजावली आहे. त्या एक ट्रान्सजेंडर असून त्यांनी केरळची पहिली ट्रान्सजेंडर वकील होण्याचा बहुमान मिळवला आहे.

रविवारी, 19 मार्च रोजी पद्मा लक्ष्मी या "बार कौन्सिल ऑफ केरळ" (Bar Council of Kerala) मध्ये नोंदणी केलेल्या पहिल्या ट्रान्सजेंडर वकील ठरल्या. लक्ष्मी (Padma Lakshmi) व्यतिरिक्त, केरळच्या बार कौन्सिलमध्ये आणखी १५०० लॉ ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.

उद्योगमंत्र्यांनी केले कौतुक (Padma Lakshmi)

केरळच्या पहिल्या ट्रान्सजेंडर वकिलाचे राज्याचे उद्योगमंत्री पी. राजीव यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर अभिनंदन केले. पद्मा लक्ष्मीचा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, पद्मा लक्ष्मीने एर्नाकुलम गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. एक तरुण वकील म्हणून स्वत:साठी वेगळा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या पद्माच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक करत तिचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आणि प्रोत्साहन देणारे आहे, असे म्हटले आहे.

मंत्री पी. राजीव यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'पद्मा लक्ष्मीने (Padma Lakshmi) जीवनातील सर्व अडचणींवर मात केली आणि केरळमधील पहिली ट्रान्सजेंडर वकील म्हणून नावनोंदणी केली. प्रथम असणे ही इतिहासातील सर्वात कठीण कामगिरी असते. तिच्या मार्गात अनेक अडथळे आली असतील. लोकांनी तिला हिनवले असेल, मदत नाकारली असेल या सर्वांवर मात करत तिने इतिहासात आपले नाव कोरले आहे.

भारताच्या पहिल्या ट्रान्सजेंडर न्यायाधीश बनलेल्या जोयिता मंडलनंतर पद्मा लक्ष्मीच्या या कामगिरीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. मंडल यांची २०१७ मध्ये पश्चिम बंगालमधील इस्लामपूर येथील लोकअदालतीमध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती.

२०१८ च्या सुरुवातीला, ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या विद्या कांबळे यांची नागपूर, महाराष्ट्र येथील लोकअदालतीमध्ये सदस्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याच वर्षी, देशाला स्वाती बिधान बरुआ रुपात तिसरे ट्रान्सजेंडर न्यायाधीश मिळाले ज्या मूळच्या गुवाहाटीच्या आहेत.


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT