नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे त्यांचे सहकारी मनीष सिसोदिया (manish sisodia) यांच्या आठवणीने भावुक झाल्याचे पहायला मिळाले. दिल्लीतील दरियापूर गावामध्ये बुधवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्कूल ऑफ एक्सीलेंसचे (School of Specialised Excellence) उद्धघाटन केले. या दरम्यान मनीष सिसोदिया यांची आठवण निघाली आणि केजरीवाल यांना अश्रु अनावर झाल्याचे पहायला मिळाले. दिल्लीचे माजी शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया हे कथित दारु घोटाळ्या प्रकरणी तुरुंगात बंद आहेत. (Kejriwal Breaks Down)
कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, मनीष सिसोदिया यांची आज खूप आठवण येत आहे. हे त्यांचे स्वप्न होते. केजरीवाल म्हणाले, काही लोकांना वाटते की, दिल्लीच्या शिक्षणावर जे काम होत आहे ते नाही झाले पाहिजे. मनीष सिसोदिया यांनी दिल्लीच्या प्रत्येक मुलाला चांगल्यातले चांगले शिक्षण मिळावे याचा चंग बाधला आहे. त्यामुळेच या लोकांनी मनीष सिसोदिया यांच्यावर खोटे-नाटे आरोप करुन तरुंगात डांबले आहे. (Kejriwal Breaks Down)
केजरीवाल म्हणाले, चांगल्या शाळा बांधल्यामुळे सिसोदिया तुरुंगात टाकण्यात आले आहे. जर त्यांनी चांगल्या शाळा केल्या नसत्या तर ते तुरुंगात गेले नसते. केजरीवाल पुढे म्हणाले, या लोकांना शिक्षण क्रांती संपवायची आहे, पण आम्ही हे होऊ देणार नाही. मी जिथे जातो तिथे दिल्लीच्या शिक्षण धोरणाची चर्चा होते. त्यामुळे त्यांना त्रास होत आहे. मनीष सिसोदिया यांचे काम आम्ही थांबू देऊ नये.
अधिक वाचा :