KCR discharged  
Latest

KCR discharged | तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना रूग्णालयातून डिस्चार्ज

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांना दुखापत झाल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरूवारी ७ डिसेंबरला त्यांना रूग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले होते. दरम्यान, आज (दि.१५) के. चंद्रशेखर राव यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या संदर्भातील व्हिडिओ एएनआयने ट्विट केला आहे. (KCR discharged)

के. चंद्रशेखर राव हे गुरूवारी ७ डिसेंबर रोजी रात्री त्यांच्या एरवल्ली येथील फार्महाऊसमध्ये पडले होते. यावेळी त्यांचे हिप बोन फ्रॅक्चर झाले होते. दरम्यान, त्यांच्यावर यशोदा रुग्णालयात हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आज ७ दिवसानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर हैदराबादमधील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. (KCR discharged)

तेलंगणात के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसचा पराभव

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत बीआरएसच्या नुकत्याच झालेल्या पराभवानंतर ही  घडला होती. दरम्यान, विधानसभेत रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ६४ जागांसह लक्षणीय विजय मिळवला. तर के चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या नेतृत्त्वाखालील बीआरएसला केवळ ३९ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, के. चंद्रशेखर राव यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली. गजवेल विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले तर कामरेड्डीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT