Katrina Kaif pregnancy 
Latest

Katrina Kaif pregnancy : कॅटरिना कैफची गुड न्यूज?; पुन्हा जोरदार चर्चा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल दोघेजण बॉलिवूडमधील क्यूट कपल आहेत. कॅटरिना -विक्की नेहमी त्याच्या हॉट फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असते. कॅट-विक्की दोघेजण ९ डिसेंबर २०२१ रोजी धुमधडाक्यात लग्न बंधनात अडकले. यानंतर मात्र, चाहत्याना कॅटच्या गुड न्यूजच्या ( Katrina Kaif pregnancy ) चर्चांना सुरूवात केली. सध्या आणखी एकदा तिच्या गुड न्यूजच्या चर्चांना सोशल मीडियात उधाण आलं आहे. मात्र, कॅट- विक्कीने याबाबत अजूनही अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

अभिनेत्री कॅटरिना कैफ नुकतेच मुंबईच्या विमानतळावर स्पॉट झाली आहे. यावेळी तिने ग्रे रंगाचा स्वेटशर्ट आणि रेड रंगाच्या पॅन्ट परिधान केली आहे. कॅटचा हा लूक एकदम साधा आणि ढिल्ल्या कपडे परिधान केलेला चाहत्यांना दिसला. यानंतर एअरपोर्ट लूकवरून चाहत्यांनी तिच्या प्रेग्नेशींबद्दल ( Katrina Kaif pregnancy ) अनेक तर्क- वितर्क लावण्यास सुरूवात केली आहे.

कॅटरिना गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या लाईफटाईमपासून दूर असल्याचे दिसत होते. यामुळेही चाहत्यांनी ती प्रेग्नेंट असल्याची चर्चा सुरू केली होती. याच दरम्यान ती पुन्हा एकदा एअरपोर्टवर ढिल्या कपड्यात दिसल्याने ती लवकरच गुज न्यूज देणार असल्याची चर्चा रंगली आहे.

पांढऱ्या रंगाचा स्नीकर्स, ब्लॅक चष्मा, केसांची स्टाईल आणि मॅचिंग मास्कने परिधान केलेला कॅटचा लूक खूपच अप्रतिम होता. हा व्हिडिओव विरल भयानी इन्स्टाग्रामवर जोरदार व्हायरल होत आहे. तर एका युजर्सने चक्क व्हिडिओला पाहून 'क्यूट मम्मी' अशी कॅप्शनदेखील दिली आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी 'Lovely ❤️', 'Queen Bollywood ❤️', 'Simply Stunning', शा कॉमेन्टस आणि अनेक हार्ट- फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या व्हिडिओला आतापर्यत ५ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. गेल्या वेळी कॅटरिना कैफ तिचा पती विकी कौशलसोबत चित्रपट निर्माता करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसली होती.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT