Karachi shopping mall fire 
Latest

Karachi shopping mall fire | कराचीतील शॉपिंग मॉलमध्ये आग, ११ जणांचा होरपळून मृत्यू

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानमधील कराची येथील एका शॉपिंग मॉलला शनिवारी (दि.२५) आग लागली. कराचीच्या रशीद मिन्हास रोडवरील आरजे मॉलमध्ये लागलेल्या या आगीत ११ जण ठार, तर एक जण जखमी आहे. या आगीच्या दुर्घटनेतून २२ लोकांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना कराची येथील जेपीएमसी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे वृत्त 'इंडिया टुडे' ने दिली आहे. (Karachi shopping mall fire)

पाकिस्तानातील जिओ न्यूजने याविषयी माहिती सांगताना म्हटले आहे की, कराचीच्या रशीद मिन्हास रोडवरील आरजे शॉपिंग मॉलमध्ये आज (दि.२५) पहाटे ही आग लागली. अग्निशमन दलाने सुमारे ५० जणांची मॉलमधून सुटका केली आहे. परंतु, आणखी काही जण इमारतीतच राहिले आहेत, तसेच त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या आगीत जखमी झालेल्या अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिओने दिली आहे.  (Karachi shopping mall fire)

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT