Latest

Kagiso Rabada : रबाडाचा दरारा

Shambhuraj Pachindre

मुंबई; वृत्तसंस्था : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळतो आहे. रबाडाची गणना ही जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. आयपीएलमध्येही त्याने हे सिद्ध करून दाखवले आहे. पण, यंदाची आयपीएल त्याच्यासाठी आतापर्यंत काही खास ठरलेली नाही. त्याच्या गोलंदाजीत आता ती धार दिसत नाही ज्याच्यासाठी तो जगभरात ओळखला जातो. काही वर्षांपूर्वी कागिसो रबाडाच्या नावाने फलंदाज थरथर कापायचे. आयपीएलमध्ये जेव्हा तो मैदानावर उतरायचा तेव्हा विरोधी संघाला घाम फुटायचा. मात्र, आता त्याचा दरारा कमी झाला आहे, फॉर्म गेला आहे. तो मैदानात संघर्ष करताना दिसतो. (Kagiso Rabada)

कागिसो रबाडाला आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने 9.25 कोटी रुपयांना विकत घेतले होते. पहिल्या सत्रात रबाडाने पंजाबसाठी आयपीएलमध्ये 23 बळी घेत सर्वांनाच प्रभावित केले होते. पण, आयपीएल 2023 मध्ये रबाडाचा जादू दिसत नाही. या मोसमात तो आतापर्यंत फक्त 5 सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याने 10.11 च्या खराब इकॉनॉमीने गोलंदाजी करताना केवळ 5 विकेटस् घेतल्या आहेत. फलंदाज त्याला मोठ्या सहजतेने धावा ठोकत आहेत. त्यामुळे रबाडाला प्लेईंग इलेव्हनमधूनही वगळण्यात आले आहे. (Kagiso Rabada)

कागिसो रबाडा जेव्हा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळायचा तेव्हा फलंदाजांना टेन्शन यायचे. 2020 हा त्याचा सर्वोत्तम आयपीएल सिझन होता, ज्यामध्ये कागिसोने 17 सामन्यांमध्ये 30 विकेटस् घेतल्या होत्या. 2020 च्या आयपीएलमध्ये त्याच्याकडे सर्वाधिक विकेटस् होत्या, ज्यामुळे त्याला पर्पल कॅप देखील देण्यात आली होती. रबाडाने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 68 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 8.40 च्या इकॉनॉमीने 104 विकेटस् घेतल्या आहेत.

आयपीएल 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुपर ओव्हर झाली होती. त्या सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने केकेआरसमोर केवळ 11 धावांचे लक्ष्य ठेवले होते. दिल्लीकडून कागिसो रबाडा सुपर ओव्हर टाकायला आला. तिथे त्याच्यासमोर स्फोटक आंद्रे रसेल होता. रसेलसारख्या वेगवान फलंदाजासमोर 11 धावांचे लक्ष्य म्हणजे काहीच नाही. मात्र, रबाडाने अप्रतिम यॉर्कर टाकून रसेलला क्लीन बोल्ड केले. रबाडाच्या षटकात केकेआरला केवळ 7 धावा करता आल्या आणि दिल्लीने तो सामना 3 धावांनी जिंकला होता.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT