electric scooter 
Latest

भारतात लाँच झाल्या तीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर

backup backup

पुणे : पुढारी वृत्तसेवा

भारतातील वाढत्या हाय-स्पीड इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये आपली उपस्थिती मजबूत करण्यासाठी जॉय ई-बाईकने भारतात तीन नवीन इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केल्या आहेत. यामध्ये Wolf+, Gen Next Nano+ आणि Del Go या बाईक्सचा समावेश आहे. यासोबतच फ्लीट मॅनेजमेंट इलेक्ट्रिक स्कूटर डेल गो देखील लॉन्च करण्यात आली आहे. Wolf+ इलेक्ट्रीक स्कूटर मॅट ब्लॅक, स्टारडस्ट ग्रे आणि डीप वाईन रंगांमध्ये येते. याची किंमत 1,10,185 रुपये इतकी आहे. Gen Next Nano+ मिडनाईट ब्लॅक आणि मॅट व्हाईट कलर पर्यायांमध्ये येते. या स्कूटरची किंमत एक्स-शोरूममध्ये 1,06,991 रुपये आहे. जॉय ई-बाईकच्या या नवीन स्कूटर्सचे बुकिंग सुरू करण्यात आले आहे. कंपनी या इलेक्ट्रीक स्कूटरवर तीन वर्षांची वॉरंटीही देत ​​आहे. स्कूटरची रेंज 100 किमी पर्यंत आहे आणि त्यांचा टॉप स्पीड 55 किमी प्रतितास आहे.

रेंज आणि स्पीड

कंपनीचा दावा केला आहे की, तिन्ही स्कूटर एका पूर्ण चार्जवर 100 किमीपर्यंतचे अंतर कापू शकतात.आणि त्यांचा टॉप स्पीड 55 किलोमीटर प्रति तास आहे. कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरवर तीन वर्षांची वॉरंटीही देत ​​आहे.

बॅटरी आणि चार्जिंग

इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दिलेली बॅटरी 60V35Ah आहे. पोर्टेबल असल्याने ही बॅटरी कुठेही चार्ज करता येते. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. स्कूटरमध्ये 1500W मोटर आहे, ती 20Nm टॉर्क जनरेट करते.स्कूटरमध्ये बसवलेले ट्विन डिस्क ब्रेक इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टीमला जोडलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचे ब्रेकिंगही चांगले होते.

स्कूटरमध्ये मिळतात तीन मोड

सुसय्य राइडसाठी यामध्ये इको, स्पोर्ट्स आणि हायपर रायडिंग मोड देखील आहेत. यासोबतच कंपनी या दोन्ही ई-स्कूटरमध्ये रिव्हर्स मोड देखील देत आहे, जे पार्किंगच्या वेळी अतिशय उपयुक्त पडू शकते. कंपनीची डेल गो डिलिव्हरी ई-स्कूटर जीपीएस सेन्सिंग, रिअल टाईम पोझिशन आणि जिओ फेन्सिंग फीचर्सने सुसज्ज आहे आणि याच्या मदतीने स्कूटरला सहज ट्रॅक करता येते. या स्कूटरसोबत कंपनी एक स्मार्ट रिमोट देखील देते. हे फीचर Wolf+ आणि Nano+ मध्ये देखील उपलब्ध आहे. याशिवाय स्कूटर्सना रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम मिळते, जे ब्रेक लीव्हर ओढल्यावर बॅटरी चार्ज करते.

काय आहेत वैशिष्ट्ये

या स्कूटरमध्ये दिलेले इंटेलिजंट फीचर्स सेन्सर्सशी कनेक्ट केले जाऊ शकतात आणि ती जॉय ई-कनेक्ट अॅपद्वारे नियंत्रित केली जाऊ शकतात. कंपनीची डेल गो डिलिव्हरी ई-स्कूटरमध्ये जीपीएस सेन्सिंग, रिअल टाईम पोझिशन आणि जिओ फेन्सिंग फीचर्सने बसवले आहेत त्यामुळे याच्या मदतीने स्कूटरला सहज ट्रॅक करता ययेऊ शकते. या स्कूटरसोबत कंपनीला एक स्मार्ट रिमोट दिला आहे. हे वैशिष्ट्य Wolf+ आणि Nano+ मध्ये देखील उपलब्ध आहे. स्कूटर्सना रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम देखील आहे, जी ब्रेक लीव्हर ओढल्यावर बॅटरी चार्ज करता येते.

https://youtu.be/noNF2Wn_uuA

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT