पुढारी ऑनलाईन डेस्क : फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन ( Johnson & Johnson ) २०२३ पासून बेबी पावडरची विक्री बंद करणार आहे. अमेरिकेमध्ये ग्राहक संरक्षण कायदान्वये सुरु असलेल्या हजारो खटल्यांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने २०२० पासूनच अमेरिका आणि कॅनडामधील विक्री बंद केली आहे. या पावडरमध्ये एस्बेस्टोस हा फायबर आढळून आला असून, तो हानिकारक आहे. त्यामुळे कर्करोग होण्याचा धोका असल्याचे मानले जाते. या पावडरची मागणीही अमेरिकेत घटली आहे. २०२० मध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये बेबी पावडरची विक्रीच बंद करण्यात आली होती. मात्र जगभरातील विविध देशांमध्ये तिची विक्री सुरुच होती.
आतापर्यंत ३५ हजार महिलांना गर्भाशयाचा कर्करोग झाल्याबद्दल कंपनीवर गुन्हे दखल आहेत. एका न्यायालयाने गर्भाशयाच्या कर्करोग होत असल्याच्या कारणातून कंपनीला १५ हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. कंपनीने जो गुन्हा केला आहे त्याची पैशाशी तुलना केली जावू शकत नाही. मात्र जेव्हा गुन्हा वाढतो तेव्हा दंडही तेवढाच मोठा हवा, असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले होते.
जॉन्सन अँड जॉन्सची बेबी पावडर ही १९८४मध्ये बाजारात आली. अल्पावधीत ती अमेरिकेसह जगभरात लोकप्रिय ठरली. तसेच कंपनीचे हे सर्वाधिक विक्रीचे उत्पादनही ठरले होते. मात्र आता या पाावडरची विक्री बंद होणार असल्याने कंपनीला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा :