Latest

Jhimma Movie : ‘झिम्मा’वर थिरकणार अवघा महाराष्ट्र

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन :

'झिम्मा' (Jhimma Movie) चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला.या चित्रपटाविषयची उत्सुकता प्रचंड वाढली. 'झिम्मा' (Jhimma Movie) कधी चित्रपटगृहात येतोय. याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. असे असतानाच आता या चित्रपटाचे शिर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे जबरदस्त गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे.

"खेळू झिम्मा गं.…" हे या गाण्याचे बोल असून या मोन्टाज सॅान्गचे शब्द आणि चाल संगीतप्रेमींना थिरकवणारे आहे. ट्रेलरमध्येच या गाण्याची झलक आपण पाहिली आणि ऐकली आहे. हे उत्स्फुर्तदायी गाणे वेगवेगळ्या वयोगटातील मैत्रिणींच्या प्रवासातील मजामस्तीवर चित्रित करण्यात आले आहे. त्यामुळे हे गाणे ऐकताना आपल्याला आपल्या सहलीची आणि मैत्रीची आठवण आल्यावाचून राहणार नाही.

अमितराज यांनी या धमाल गाण्याला संगीत दिले असून वैशाली सामंत, मुग्धा कऱ्हाडे, आरती केळकर, सुहास जोशी यांनी हे गाणे गायले आहे. 'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित 'झिम्मा' चित्रपट १९ नोव्हेंबरला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.

हेमंत ढोमे दिग्दर्शित हा चित्रपट आहे. लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट आहे. वेगवेगळ्या वयाच्या आणि वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या स्त्रिया असतात. काही काळ जबाबदाऱ्या बाजूला ठेवत मनमुराद जगण्यासाठी इंग्लंडला जातात. मग काय धम्माल होते, हे लवकरच प्रेक्षकांना या चित्रपटामधून पाहायला मिळणार आहे.

सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेसृष्टीतील सात वेगळ्या धाटणीच्या अभिनेत्री एकाच चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. ही प्रेक्षकांसाठी खरंच पर्वणी ठरणार आहे.

या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हेदेखील वाचा-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT