मुंबई; पुढारी वृत्तसेवा : देशातील आयआयटीमध्ये तसेच एनआयटी प्रवेशात यंदा मोठी चुरस होणार आहे. मागील वर्षी खुल्या प्रवर्गाचा पात्रता कटऑफ ९०.७७ पसैटाईल होता. यंदा तो ९३.२ वर पोहोचला आहे. याचाच अर्थ ज्या विद्यार्थ्यांना ९३.२ ते १०० पर्सेटाईल आहेत असेच विद्यार्थी आयआयटी परीक्षेत सहभागी होऊ शकतील अशा विद्यार्थ्यांची संख्या ९७ हजार ३५१ एवढी आहे.
जेईई मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. आता आयआयटी प्रवेशासाठी होणाऱ्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेची तयारी सध्या सुरू आहे. मुख्य परीक्षा निकालात खुला प्रवर्गासह राखीव प्रवर्गाच्या कटऑफमध्येही वाढ झाली आहे. मागील पाच वर्षांचा ट्रेंड पाहता यंदा जेईई अॅडव्हान्स परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रता पर्सेटाईल यंदा अधिक आहे. यंदा ५६ विद्यार्थ्यांना १०० पर्सेटाईल आहे. नामवंत संस्था मध्ये प्रवेश घेण्यासाठी स्पर्धा असेल.
जेईई अॅडव्हान्स परीक्षा २६ मे रोजी होणार असून २७ एप्रिलपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. ७ मेपर्यंत परीक्षा अर्ज करता येतील. परीक्षेचा निकाल ९ जूनला लागेल. या परीक्षेसाठी सुमारे २ लाख ५० हजार २८४ विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता आहे. या परीक्षा निकालावर प्रवेशाचे चित्र स्पष्ट होईल.
हेही वाचा :