Latest

Jaydev Unadkat : जयदेव.. जयदेव… जय उनाडकट!

सोनाली जाधव

मुंबई : वृत्तसंस्था : सौराष्ट्रच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या जयदेव उनाडकटने (Jaydev Unadkat) दिल्लीविरुद्ध सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात विक्रम रचला. त्याने ध्रुव शोरे, वैभव रावल आणि कर्णधार यश धुल यांना लागोपाठ तीन चेंडूंत बाद करून हॅट्रिक रचली. डावाच्या पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेणारा रणजी चषक स्पर्धेच्या इतिहासातील तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे. त्याने दिल्लीच्या ८ विकेटस् आपल्या पोत्यात घातल्या.

डावखुरा वेगवान गोलंदाज उनाडकट याने १२ वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात यशस्वी पुनरागमन केल्यानंतर धुरळा उडवला. उनाडकटने या हॅट्ट्रिकसह दिल्ली संघाच्या एकूण सहा विकेटस् घेतल्या. पाच षटकांनंतर दिल्लीची अवस्था सात बाद दहा इतकी बिकट झाली होती.

भारतीय कसोटी संघात पुनरागमन करताना तीन विकेट घेणाऱ्या जयदेव उनाडकटने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळवण्याची पूर्ण तयारी केली आहे. अनुभवाच्या बळावर त्याने गेल्या काही वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी केली आहे. उनाडकटने ३९ धावांत ८ विकेटस् घेतल्या आहेत.दिल्ली संघाच्या सलामीच्या फळीतील पहिले चार फलंदाज ध्रुव शोरे, वैभव रावल, यश धुल आणि नवा सलामीवीर आयुष बडोनी हे सर्व शून्यावर बाद झाले. १२ षटकांत ३९ धावांच्या मोबदल्यात जयदेवने ८ गडी बाद केले.

प्रांशू विजयरन आणि हृतिक शोकीन यांनी नऊ षटकांपेक्षा अधिक काळ सौराष्ट्रच्या गोलंदाजांना रोखण्यात यश मिळवले. मात्र प्रेरक मांकडने अखेर प्रांशूचा बळी टिपलाच. हृतिक शोकीन (६८) आणि शिवांक वशिष्ट (३८) यांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने पहिल्या डावात १३३ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर सौराष्ट्रने धुवाधार बॅटिंग करताना ४६ षटकांत १ बाद १८४ धावा केल्या होत्या. सलामीवीर हार्विक देसाईने (१०४) नाबाद शतक झळकावले. आता त्यांच्याकडे ५१ धावांची आघाडी आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT