पुणे; पुढारी वृत्तसेवा : ट्रिपल सीट जाताना कारवाई केल्यामुळे महिनाभरापूर्वी वाहतूक कर्मचार्याशी हुज्जत घातल्याचा प्रकार घडला होता. याच प्रकारातून बदला घेण्यासाठी बुधवारी सायंकाळी सैन्य दलात कार्यरत असलेल्या एका जवानाने पोलिस अंमलदाराच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून खुनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
याप्रकरणी वैभव संभाजी मनगटे (25, रा. मु. पो. मंगरूळ, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिस कर्मचारी पंकज शंकर भोपळे (36) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद
दिली आहे.
हेही वाचा