मलोली ; पुढारी वृत्तसेवा मलोली ता .माळशिरस येथील सकल मराठा समाज बांधव यांच्या माध्यमातून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाज, मलोली यांच्या माध्यमातून साखळी उपोषणास आज प्रारंभ करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की,मराठा आरक्षण मागणीसाठी पुकारलेल्या या आंदोलनास मलोली गावातील सर्व समाज बांधवांच्या वतीने पाठींबा देण्यात आला. या वेळी साखळी आंदोलनाच्या पूर्वसंध्येला गावातून कँडल मार्च काढण्यात आला. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आरक्षण मागणीसाठी घोषणा देवून कँडल मार्च सुरुवात करण्यात आली. या वेळी गावातील लहान मुलांसह हजारो तरुण युवक हजर होते.
तरुणाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.कँडल मार्च समारोपानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सर्व समाज बांधव एकत्र येवून राष्ट्रगीताने कँडल मार्चॅची सांगता करण्यात आली. या वेळी आरक्षण आमच्या हककाचे ,नाही कुणाच्या बापाचे,कोण म्हणतंय देत नाय,घेतल्या शिवाय राहत नाय , छत्रपती शिवाजी महाराज की जय अश्या घोषणा देण्यात आली.
जोपर्यंत आरक्षण दिले जात नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण चालू ठेवणार असल्याचे ग्रामस्थ मंडळी यांनी सांगितले. शुक्रवार सकाळी नऊ वाजल्या पासून साखळी उपोषणास प्रारंभ केला असून, दिवस रात्र हे साखळी उपोषण चालू असणार आहे. या वेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.