पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीर मधील किश्तवार जिल्ह्यातील पुल्लर नागसेणी येथे मुसळधार पावसामुळे घर कोसळून झालेल्या घटनेत तीन अंध भावांचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.२७) रात्री ही घटना घडली. राजेश, साजन आणि पप्पू अशी मृत्यू झालेल्या भावांची नावे आहेत. कुटुंबातील इतर सदस्य मात्र सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा :