New Parliament Building: नवीन संसदेचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

Parliament Winter Session
Parliament Winter Session
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (दि.२८) नवीन संसदेची (New Parliament Building) वास्तू देशाला समर्पित करतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार तसेच इतर नेते कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित राहतील. जवळपास २१ विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. तर, २५ पक्षांनी या कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याचे कळवले आहे.१० डिसेंबर २०२० मध्ये नवीन संसद बांधकामाचा पंतप्रधानांनी शिलान्यास केला होता.१२०० कोटींचा निधी या भव्य वास्तू उभारण्यावर खर्च करण्यात आला आहे.

नवीन संसद भवनात (New Parliament Building)  देशाची वैविध्यपूर्ण संस्कृतीची झलक बघायला मिळणार आहे. या इमारतीत लावण्यात आलेली फरशी ही त्रिपुरातील बांबूपासून बनवण्यात आली आहे. तर, गालिचांसाठी प्रसिद्ध उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील विशेष गालिचे संसदेत लावण्यात आले आहेत. इमारतीत वापरण्यात आलेले सागवान लाकूड नागपुरातून आणण्यात आले होते. लाल-पांढरे वाळूंचे खडे राजस्थानमधील सर्मथुरा येथून आणण्यात आले. लाल किल्ला आणि हुमायूंच्या थडग्यात देखील असे खडे दिसतात. तर, भगवा-हिरवा दगड उदयपूर, लाल ग्रॅनाईट अजमेरजवळील लाखा आणि पांढरा संगमरवरी राजस्थानमधील अंबाजी येथून मागवण्यात आला होता.

लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहात फॉल्स सिलिंग साठी वापरण्यात आलेले स्टीलचे स्ट्रक्चर दमण-दीव येथून खरेदी करण्यात आले. इमारतीतील संपूर्ण फर्निचर मुंबईत बनवण्यात आले. राजस्थानातील राजगनर आणि उत्तर प्रदेशातील नोएडा येथे दगडी जाळीचे काम करण्यात आले. अशोक चिन्हासाठी लागलेले साहित्य महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि राजस्थानमधील जयपूर येथून मागवण्यात आले होते. तर, इमारतीवर लावण्यात आलेले अशोक चक्र मध्य प्रदेशातील इंदूर येथून आणण्यात आले आहे.

New Parliament Building : उद्घाटन समारंभावर या पक्षांचा बहिष्कार

काँग्रेससह शिवसेना (उ.बा.ठा), एनसीपी, डीएमके, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, भाकपा, झामुमो, केरल काँग्रेस (मणि), विदुथलाई चिरुथिगल कच्ची, रालोद, टीएमसी, जदयू, सीपीआई (एम), आरजेडी, एआयएमआयएम, ऑल इंडिया यूनाइटेड डेमोकेटीक फ्रंट (एआययूडीएफ), इंडियन यूनियन मुस्लिम लीग, नेशनल कॉन्फ्रेंस, रिवोल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी आणि एमडीएमके पक्षाने या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news