परतूर : पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परतूर शहरातील एका (४० वर्षीय) युवकाने विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. दत्ता गणेशराव खालापुरे असे या युवकाचे नाव असून, तो परतूर शहरातील जिल्हा परिषद प्रशालेजवळचा रहिवासी आहे.
सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याने शेतातील किटकनाशक प्राशन केले. का प्रकार घरातील सदस्यांच्या लक्षात आल्यानंतर त्याला तातडीने वाटूर १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून डॉ.अंकुश कुरे आणि रुग्णवाहिका चालक बाबा शेख यांनी परतूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती गंभीर होत आहे. असे असतांना शासन अजुनही गंभीर नाही. शासनाच्या या भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण विष प्राशन केल्याचे दत्ता खालापुरे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा :