न्‍यू यॉर्कमधील कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन इव्हेंटमध्ये बाेलताना भारताचे परराष्‍ट्र मंत्री एस. जयशंकर. 
Latest

निज्‍जर हत्‍या प्रकरणी जयशंकर यांनी सुनावले, “तुम्‍ही चुकीच्‍या माणसाला …”

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मी काही 'पंचनेत्र (फाइव्ह आइज) करार' चा भाग नाही. तसेचच अमेरिकेन गुप्‍तचर संस्‍था एफबीआयमध्‍येही काम करत नाही. त्‍यामुळे तुम्‍ही चुकीच्‍या माणसाला प्रश्‍न विचारत आहात, अशा शब्‍दांमध्‍ये  न्यूयॉर्कमधील कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन इव्हेंटमध्ये परराष्‍ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सुनावले. निज्‍जर हत्‍या प्रकरणी विचारण्‍यात आलेल्‍या प्रश्‍नाला ते उत्तर देत हाेते.

ब्रिटिश कोलंबियातील सरे येथे खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर या कॅनेडियन नागरिकाच्या हत्या झाली होती. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी १८ सप्टेंबर रोजी या हत्‍येत भारतीय एजंटचा सहभाग असल्‍याचा खळबळजनक आरोप संसदेत केला होता. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ब्रिटन आणि अमेरिका या पाच देशांत 'पंचनेत्र (फाइव्ह आइज) करार' झाला आहे. या करारानुसार हे देश एकमेकांस गुप्तचर संदेशवहनाची संपूर्ण माहिती देतात. एका देशाच्या गुप्तचर यंत्रणेस हाती लागलेले काही धागेदोरे अन्य चौघांत वाटून घेतले जातात. खलिस्‍तानी दहशतवादी निज्‍जर मृत्‍यूबद्‍दल 'फाइव्ह आइज'मध्‍ये गुप्‍त माहितीचे अदान-प्रदान झाले आहे. यासंदर्भातील अहवालांबद्दल न्यूयॉर्कमधील कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन इव्हेंटमध्ये जयशंकर यांना सवाल करण्‍यात आला.

कॅनडाला पूर्ण सहकार्याची ग्‍वाही

यावेळी जयशंकर यांनी स्‍पष्‍ट केले की, मी काही 'पंचनेत्र (फाइव्ह आइज) करार' चा भाग नाही. तसेचच अमेरिकेन गुप्‍तचर संस्‍था एफबीआयमध्‍येही काम करत नाही. त्यामुळे तुम्ही चुकीच्या व्यक्तीला विचारत आहात असे मला वाटतेतुम्ही म्हणताय का की, कॅनडायने आम्हाला कागदपत्रे दिली. माझ्याकडे माहिती असती तर मी ती पाहिली नसती का, असा सवाल करत याप्रकरणी आम्‍ही कॅनडाला पूर्ण सहकार्याची ग्‍वाही दिल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

दहशतवादी नेते कॅनडामध्‍ये वास्‍तव्‍याला

निज्जर सारख्या दहशतवाद्यांचा संदर्भ असलेल्या दाव्यांबद्दल भारत कॅनडियन्सची बदनामी करत आहे का, या प्रश्‍नावर जयशंकर म्‍हणाले की, भारताने मोठ्या प्रमाणात प्रत्यार्पण विनंत्या केल्या आहेत. कॅनडाने खरोखरच फुटीरतावादी शक्ती, संघटित गुन्हेगारी, हिंसाचार आणि अतिरेकी यांच्याशी संबंधित बरेच संघटित गुन्हे पाहिले आहेत. तेथे दहशतवादी नेते वास्‍तव्‍यास आहेत. आम्ही त्यांना संघटित गुन्हेगारी आणि नेतृत्वाविषयी बरीच माहिती दिली आहे, असेही जयशंकर यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT