Latest

Jacqueline fernandez : जॅकलिनला देश सोडण्यासाठी कोर्टाच्या परवानगीची गरज नाही ; मिळाला दिलासा

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन : २०० कोटींच्या मनी लॉड्रिंग प्रकरणी बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेखरसोबत अटकेची टांगती तलवार असलेल्या जॅकलिनला कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. जॅकलिन सध्या जामिनावर बाहेर आहे. तिच्या जामिनावरील जाचक अटी कमी करत कोर्टाने तिला काहीसा दिलासा दिला आहे. जॅकलिन आता कोर्टाची पूर्वपरवानगी न घेता देशाबाहेर जाता येणार आहे. पतियाळा हाऊस कोर्टाने या संबधीचे आदेश दिले आहेत. अर्थात तिला परदेशी जाण्यापूर्वी कोर्टाला तीन दिवस आधी सूचना द्यावी लागणार आहे.

यावर बोलताना कोर्ट म्हणते कि, जॅकलिनने आजवर जामीनाच्या कोणत्याही शर्तीचा भंग केला नाही. तसेच जॅकलिन ही सिनेसृष्टीतील कलाकार असल्याने अनेकदा तिला कामानिमित्त परदेशवारी करावी लागते. अशा वेळी तिला तयारीसाठी खूप कमी कालावधी मिळतो. अशा वेळी पूर्वपरवानगी घेणे हे वेळखाऊ असल्याने अनेकदा महत्त्वाच्या संधि तिच्या हातातून जाण्याची शक्यता असते.
इथून पुढे  तिने तिच्या परदेशातील प्रवासाची माहिती देणारा अर्ज कोर्टात दाखल केल्यावर, तिचा पासपोर्ट 50 लाख रुपयांच्या मुदत ठेव पावती (FDR) ठेवीच्या अधीन राहून लगेच जारी केला जाईल. पूर्वपरवानगी घेण्याच्या अटींबाबत जॅकलिनने कोर्टात धाव घेतल्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

संबंध नाकारले… 

जॅकलिनने तथाकथित बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेखरशी असलेले सर्व संबंध नाकारले आहेत. यादरम्यान त्याने जेलमधून तिच्यासाठी एक रोमॅंटिक पत्रही लिहलं होतं. यात तो म्हणतो, ' त्याच्या वाढदिवसापेक्षा मोठा आहे. तो म्हणाला की तो तिला भेटवस्तू देण्यास उत्सुक आहे. पण पुढच्या वर्षी तुझ्या वाढदिवसादिवशी आपण  एकत्र असणार आहोत. मी तो वाढदिवस आणखी खास बनवण्याचे वचन देतो. त्या सेलिब्रेशनचा  जगाला हेवा वाटेल. बाळा, माझ्या बोम्मा. तू एक सुपरस्टार आणि सुपर आहेस. विशेष. माझ्या आयुष्यात घडलेली सर्वोत्कृष्ट गोष्ट तू आहेस.' विशेष म्हणजे जॅकलिनने नुकताच तिचा वाढदिवस न्यूयॉर्कमध्ये साजरा केला. याबाबतचे फोटोही तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT