पुढारी ऑनलाइन डेस्क : J & K Accident News : जम्मू काश्मीरच्या डांगदुरू धरणाजवळ किश्तवाड येथे १० जणांसह निघालेल्या एका क्रूजर वाहनाचा अपघात झाला. अपघातात ७ ठार तर १ जण जखमी झाला आहे. जखमींना किश्तवारच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. एएनआयने याचे ट्विट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकल दुल प्रकल्पाचे हे क्रूजर वाहन होते. ते १० जणांसह निघाले होते. दरम्यान डांगदुरू धरणाजवळ किश्तवाड येथे या वाहनाचा अपघात झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह हे डीसी किश्तवार डॉ. देवांश यादव यांच्याशी अपघाताबाबत चर्चा केली. J & K Accident News
यावेळी माहिती देताना यादव यांनी घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून १ जण गंभीर जखमी झाला आहे, अशी माहिती दिली. तसेच जखमींना आवश्यकतेनुसार जिल्हा रुग्णालय किश्तवार किंवा जीएमसी डोडा येथे हलवले जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले आवश्यकतेनुसार सर्व मदत केली जाईल.
हे ही वाचा :