पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल-हमास युद्धविरामाच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या आहेत. हमासने सुमारे ५० इस्त्रायलच्या ओलीस नागरिकांची सुटका करणे आणि इस्रायली तुरुंगातून पॅलेस्टिनी महिला आणि मुलांची सुटका करण्यासाठी या वाटाघाटी सुरु असल्याचे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे. ( Israel-Hamas truce deal )
७ ऑक्टोबर २०२३ रोजी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर भीषण हल्ला केला. या हल्ल्यास इस्रायलनेही जोरदार प्रत्युत्तर दिले. इस्रायलवरील हल्ल्यादरम्यान हमासने सुमारे २४० इस्रायली लोकांना ओलिस म्हणून गाझा येथे नेले आणि १,२०० लोकांना ठार केल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
आता युद्ध सुरू झाल्यापासून ओलिसांची सुटका आणि प्रारंभिक कैद्यांच्या अदलाबदलीसाठी चर्चा सुरु झाली आहे. या वाटाघाटी अंतिम टप्प्यावर आहेत. हमासने सुमारे ५० नागरिक ओलीसांची सुटका आणि इस्रायली तुरुंगातून पॅलेस्टिनी महिला आणि मुलांची सुटका करण्यासाठी आहे, असल्याचे वृत्त रॉयटर्सने इस्रायली अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे. दरम्यान, मंगळवार २० रोजी हमासच्या नेत्याने रॉयटर्सला माहिती दिली होती की, इस्रायलशी युद्धबंदी करारावर पोहोचण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे इस्त्रायली सैन्याने गाझामध्ये सुरू असलेल्या जमिनीवर आक्रमण करूनही हमासच्या नेत्याकडून युद्धबंदीची भाषा सुरु झाल्याने याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
हेही वाचा :