Latest

ISIS Attack : बारा सैनिकांसह ३२ जणांची ‘इसिस’ दहशतवाद्यांकडून हत्या

अमृता चौगुले

हमा; वृत्तसंस्था : सीरियातील हमा शहरालगतच्या वाळवंटी भागात या संघटनेच्या दहशतवाद्यांनी 32 जणांची हत्या केली. ब्रिटनच्या सीरियन ऑब्झर्व्हेटरी या मानवाधिकार संघटनेने घटनेची माहिती दिली. सीरियाची अधिकृत वृत्तसंस्था 'सना'ने या माहितीला दुजोरा दिला आहे. (ISIS Attack)

एका घटनेत दहशतवाद्यांनी मेंढ्या चारत असलेल्या 4 जणांची हत्या केली आणि सर्व मेंढ्या लांबविल्या. दोनजणांचे अपहरण केले. अन्य एका घटनेत मशरूम मिळविण्यासाठी आलेल्या 16 जणांची 'इसिस'च्या दहशतवाद्यांनी हत्या केली. (ISIS Attack)

तिसर्‍या एका घटनेत 'इसिस'ने 12 सैनिकांना ठार केले. 'इसिस'चे जिहादी मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी मेंढपाळांवर स्वयंचलित रायफलने गोळ्या झाडल्या. 12 वर्षांच्या युद्धात सीरियाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. मशरूम हे अनेकांच्या निर्वाहाचे मुख्य साधन आहे. मशरूम मिळविण्यासाठी वाळवंटात भटकावे लागते. मशरूम हे पीक असले तरी ते मिळविण्यासाठी मशरूमची शिकार हा शब्द वापरला जातो. (ISIS Attack)

ट्रफल : मौल्यवान सीरियन मशरूम

ट्रफल नावाच्या सीरियन वाळवंटातील मशरूमला जगभरात मोठी मागणी आहे. हे मशरूम मौल्यवानदेखील आहे.

सरकारी निर्बंध असूनही लोक दुर्गम वाळवंटात ते मिळविण्यासाठी जातात व 'इसिस'च्या हल्ल्याचे बळी ठरतात.
सीरियन ट्रफल्सची किंमत दर्जा व प्रकारानुसार 1 हजार रुपयांपासून 19 हजार रुपये किलोपर्यंत आहे, हे विशेष.

१५ जणांचे शिर धडावेगळे

फेब्रुवारीपासून आजअखेर ट्रफल्स मिळविण्याच्या नादात 230 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
त्यापैकी 15 जणांचे शिर 'इसिस'ने धडावेगळे (मार्चमध्ये) केले होते.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT