Latest

हॉररपट Conjuring सत्य घटनेवर आधारित आहे का?

Pudhari News

पुढारी ऑनलाईन –  हॉरर चित्रपटांचा स्वतंत्र असा एक चाहता वर्ग आहे. या प्रेक्षकांसाठी पर्वणी असते ती म्हणजे Conjuring या मालिकेतील चित्रपट. Conjuring या भयपटातील आतापर्यंतचे सर्वच सिनेमे सिनेरसिकांच्या अंगावर शहारे आणण्यासाठी कमालीचा यशस्वी ठरले आहेत. (Is conjuring based on a true story) पण हे हॉररपट सत्यघटनांवर आधारित आहे का, ही चर्चा नेहमी सुरू असते.

The Conjuring 3: The Devil Made Me Do It हा चित्रपट आणि यापूर्वीचेही या मालिकेतील चित्रपट सत्यघटनावर आधारित आहेत. सत्यघटना आणि त्याला सिनेमॅटिक तडका देऊन जबरदस्त हॉररपट बनवायचा हे Conjuringचे तंत्र आहे. शिवाय या चित्रपटांचे बजेटही कमी असते. त्यामुळे कमी बजेटमध्ये चांगली कमाई ही सिनेमे करतात. (is conjuring based on a true story)

अमेरिकेत खुनाची एक घटना घडली होती. Trial of Arne Cheyenne Johnson या नावाने हा खटला प्रसिद्ध आहे. या हत्याकांडात आरोपीच्या वकिलांनी बाजू मांडताना आरोपीने केलेला खून हा भूतबाधेच्या प्रभावखाली केलेला आहे, असा बचाव मांडला होता; पण न्यायालयाने हा बचाव फेटाळून लावत आरोपीला शिक्षा ठोठावली होती.

या खटल्यातील आरोप आर्नी जॉन्सन याच्यावर घरमालकाच्या खुनाचा आरोप होता. ११ वर्षाच्या मुलाच्या शरीरातील कथित भूत काढण्याचा विधी सुरू असताना या कथित भूताने माझा ताबा घेतला आणि त्यातून माझ्या हातून हा गुन्हा घडला, असा बचाव जॉन्सने मांडला होता.

दिग्दर्शक काय म्हणतात?

या चित्रपटाचे दिग्दर्शक मायकेल चावेज यांनी एका मुलाखतीत यावर खुलासा केला आहे. "माझ्या हातात जी स्क्रीप्ट होती, त्यामध्ये एक व्यक्ती आहे, जी प्रत्यक्षात पीडित आहे. जो व्यक्ती स्वतःला भूतबाधा झाल्याचा दावा करत होता, त्याच्या व्ह्यू पॉईंटने हा चित्रपट मांडला आहे. आम्ही चित्रपटातून योग्य न्याय देऊ शकलो आहे, असं वाटतं."

चित्रपटातील ईड आणि रेन वॉर्न कोण आहेत?

The Conjuring Universe या नावाने ही माध्यम कंपनी कार्यरत आहे. Supernatural घटनांवर चित्रपट बनवण्याचं काम ही कंपनी करते. आतापर्यंत या कंपनीने  The Conjuring (2013).  Annabelle (2014), The Conjuring 2 (2016), Annabelle: Creation (2017), The Nun (2018), The Curse of La Llorona (2019), Annabelle Comes Home (2019), The Conjuring 3: The Devil Made Me Do It असे चित्रपट बनवले आहेत.

यातील Conjuring मालिकेत भूतांशी लढणारं एक कपल दाखवलं आहे. ईड आणि रेन वार्न हे कपल या चित्रपटांच्या केंद्रस्थानी असतं. ही दोन्ही पात्र ५०च्या दशकातील अमेरिकेतील पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर ईड आणि रेन यांच्यावर बेतलेलं आहे.

Conjuringचं यश कशात आहे?

Conjuringने आतापर्यंत जेवढे काही चित्रपट आणले ते हॉररच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरले आहेत. याच कारण म्हणजे चित्रपटाचं दिग्दर्शन. आणि चित्रपटांची एकमेकांत केलेली गुंफण. एखाद्या भागातील रहस्याचा उलगडा हा दुसऱ्याच कोणत्यातरी भागात होतो. त्यामुळे चाहत्यांना सर्व भाग पाहिल्याशिवाय पूर्ण कथा समजू शकत नाही. बाकी साऊंड इफेक्ट, प्रकाश रचना तर हॉररला शोभेल अशी असते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT