alia bhatt and ranbir kapoor  
Latest

आलीया रणबीरला गल्लीपासून दिल्लीपर्यंत शुभेच्छा, पण ‘त्या’ जवळच्या लोकांनी सपशेल टाळले !

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे लग्न झाले. लग्नासाठी फक्त निमंत्रित हजर होते. मात्र,१६ एप्रिलला झालेल्या रिसेप्शनमध्ये चित्रपटसृष्टीतील स्टार्सनी हजेरी लावली. तसेच सोशल मिडीयावरही रणबीर आणि आलिया या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र आरआरआर चित्रपटाच्या टीममधील कोणीही आलिया भट्टचे अभिनंदन केले नाही की शुभेच्छा नाही दिल्या. त्यामुळे 'RRR' टीम आलिया भट्टवर नाराज आहे काय ? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडत आहे.

आलियाच्या लग्नाला पोहोचण्यासाठी टीम आरआरआरने चार्टर प्लेनही बुक केल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते, पण तसे काहीच झालेले दिसत नाही. की नाही एसएस राजामौली, ज्युनियर एनटीआर किंवा राम चरण यापैकी कोणीही आलियाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. कोणाचीही शुभेच्छा देणारी सोशल मीडिया पोस्ट देखील यादरम्यान दिसली नाही. यावरूनच असे दिसते की, आलिया आणि आरआरआर टीममध्ये सर्व काही ठीक नाही.

आरआरआर चित्रपटाच्या फायनल इडिटींगमधील आलियाचे काही सीन कट करण्यात आल्याने, ती नाराज असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्घ झाल्या होत्या. यावरून आलियाने इंस्टाग्रामवरून आरआरआरशी संबंधित काही पोस्टही डिलीट केल्या होत्या. आलियाने आरआरआर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये देखील भाग घेतला नाही. तसेच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एसएस राजामौली यांनाही अनफॉलो केले आहे. त्यानंतर आलिया भट्टने एक पोस्ट शेअर करत एसएस राजामौली आणि तिच्यातील सर्व काही ठीक असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचलत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT