इरसाळवाडी (Irshalwadi Landslide Incident) 
Latest

Irshalwadi Landslide Incident : मुसळधार पाऊस, अरुंद पायवाट, रात्रीचा अंधार; गिरीश महाजनांनी सांगिलता इरसाळवाडी गावातील थरार

backup backup

: रायगड जिल्ह्यातील इरसाळवाडी गावात दरड कोसळल्यानंतर मोठी दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच आम्ही त्या ठिकाणी रवाना झालो. मुसळधार पडणारा पाऊस पडत होता. अरुंद अशी पायवाट होती आणि रात्रीचा अंधार अशा परिस्थितीत आम्ही घटनास्थळी पोहोचलो. आजवर मी अनेक ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत भेट दिले आहेत. मात्र, यासारखा खडतर प्रवास माझ्या राजकीय जीवनात प्रथमच अनुभवला असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. इरसाळवाडी गावात दरड कोसळल्याचे समजताच मंत्री महाजन तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले. रात्री तीन वाजेच्या दरम्यान ते इरसाळवाडीला पोहोचले. त्यांच्यासोबत आमदार महेश बालदी हे देखील होते. याठिकाणी केलेल्या बचाव कार्याचा थरार मंत्री महाजन यांनी सांगितला आहे. (Irshalwadi Landslide Incident)

बचाव कार्यात निसर्गाचा अडथळा….(Irshalwadi Landslide Incident)

रात्री तीन वाजेच्या सुमारास आम्ही येथे पोहोचलो तेव्हा अतिशय मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू होता. अक्षरशा आपण उडून जाऊ असे वाटत होते. तीन साडेतीन फुटाचा रस्ता आणि रस्त्याच्या दुतर्फा खोल अशी दरी असा रस्ता पार करून आम्ही या ठिकाणी पोचलो. या ठिकाणी पूर्ण अंधार असल्यामुळे काय करावे हेच सुचत नव्हते. त्यामुळे पाच साडेपाच वाजेपर्यंत आम्ही वाट पाहिली, असे मंत्री महाजन म्हणाले. त्यानंतर एनडीआरएफची टीम आणि खालच्या गावातील काही कार्यकर्ते या ठिकाणी मदतीसाठी पोहोचले. या ठिकाणी पाऊस इतका मुसळधार सुरू होता की मदत कार्यात अडचणी येत होत्या. नऊ मृतदेह बाहेर काढून त्यांचे या ठिकाणी दफनविधी करण्यात आले. या ठिकाणी ७० ते ८० लोक आम्ही वाचले असल्याचे पाहिले ते कुठे गावाबाहेर गेल्यामुळे बचावले आहेत. मात्र, गावातील अनेक लोकांचा अजूनही पत्ता लागलेला नाही, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले. (Irshalwadi Landslide Incident)

सर्वतोपरी मदत करणार…(Irshalwadi Landslide Incident)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सतत फोनवर संपर्कात असून शासन या ठिकाणी सर्वतोपरी मदत करत आहे. डोंगराळ भाग असल्यामुळे बचाव कार्यासाठी जेसीबी वगैरे यंत्रांचा वापर शक्यच नव्हता. खराब हवामान व लँडीगकरिता जागा नसल्यामुळे हेलीकॉप्टरची मदत घेता येत नव्हती. शेवटी अत्याधुनिक तांत्रिक मदतीविना, बचावकार्य सुरु केले. हातानेच मातीचा मलबा उपसण्याच्या कामी सर्वजण लागले. प्रत्येकजण आप्त-स्वकीयांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता, अशी माहिती महाजन यांनी दिली. (Irshalwadi Landslide Incident)

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT