Latest

IPL Final 2023 : पावसामुळे टॉसला विलंब

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क :  यंदा आयपीएलच्या हंगामातील अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रविवारी (दि.२८) खेळवला जाणार आहे. हा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे टॉसला विलंब झाला आहे.

वास्तविक टॉस ७. वा होणे अपेक्षित होते. मात्र, पावसामुळे टॉसला विलंब होताना दिसत आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात या दोन संघांमध्ये क्वालिफायर २ चा सामना झाला होता. या सामन्यातही टॉसला ४५ मिनीटे विलंब झाला होता.  यंदा आयपीएल स्पर्धेचा प्रारंभ अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियवरच झाला होता. पहिल्या सामन्यता गुजरात आणि चेन्नई हेच संघ आमने-सामने होते.

गरज पडली तर सुपर ओव्हरने सामन्याचा निकाल लावणार

पावसामुळे टॉसला विलंब होत आहे. यावर आयपीएलचे चेअरमन अरुण धूमल यांनी 'भास्कर'शी बोलताना सांगितले की, आत्ता सध्या पाऊस सुरु आहे. आम्ही शेवटपर्यंत सामना होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. गरज पडली तर या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरनेही लावला जाईल.

आता गुजरात आणि चेन्नई आयपीएल फायनलमध्ये पुन्हा एकदा भिडणार आहेत. या सामन्याआधी गुजरात सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावून चेन्नई आणि मुंबई्च्या विक्रमाशी बरोबरी करणार की, चेन्नई विजेतेपद पटकावून पाचव्यांदा मुंबईच्या विक्रमाशी बरोबरी करणार अशा चर्चांनी जोर धरला आहे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT