Latest

IPL 2024 Rishabh Pant : पंजाबविरूद्धच्या सामन्यात सर्वांच्या नजरा ऋषभ पंतवर; आज दिल्ली पंजाबला भिडणार

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या 17 व्या हंगामातील दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज ( दि. २३ मार्च  होणार आहे. या सामन्या दरम्यान क्रिकेट चाहत्यांच्या नजरा ऋषभ पंतवर असणार आहेत. डिसेंबर 2022 मध्ये रस्ता अपघातात जखमी झाल्यानंतर ऋषभ 15 महिन्यांच्या कालावधीनंतर व्यावसायिक क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना दिसणार आहे. (IPL 2024 Rishabh Pant)

ऋषभने केला नेटमध्ये फलंदाजीचा सराव

ऋषभला माहित आहे की, जुन्या लयीत परत येण्यासाठी थोडा वेळ लागेल. म्हणून त्याने संघासोबत सराव करताना नेटमध्ये जास्त वेळ बॅटिंग केली. पंत म्हणतो की, मला मैदानावर उतरल्यावर वेगळीच अनुभूती येते. मला मैदानावर टिकून शक्य तितकी फलंदाजी करायची आहे. (IPL 2024 Rishabh Pant)

गेल्या हंगामात दोन्ही संघांची सुमार कागमिरी

आयपीएलच्या 17 व्या हंगामातील दुसरा सामना दिल्ली आणि पंजाब यांच्यात होणारा आहे. 2023 च्या हंगामात दोन्ही संघांनी सुमार कामगिरी केली होती. गेल्या हंगामात डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली गुणतालिकेत नवव्या तर पंजाब आठव्या स्थानावर होता. दिल्लीचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग पंतबद्दल म्हणातात की, यंदाच्या आयपीएलसाठी त्याने फलंदाजीची अधिक तयारी केली आहे. सरावासह सामन्या दरम्यान त्याला स्वताच्या कामगिरीवर विश्वास ठेवावा लागेल. या दोन्ही संघातील सामना मुल्लानपूर येथील महाराजा यादविंदर सिंग क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

पंत विकेटकीपिंग करणार ?

आजच्या सामन्यात पंत विकेटकीपिंग करणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जर त्याने पंजाबविरुद्ध विकेटकीपिंग केले नाही तर ही जबाबदारी शाय होप किंवा दक्षिण आफ्रिकेचा ट्रिस्टन स्टब्स घेऊ शकतात. दिल्लीची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही मजबूत आहे.
कसोटी क्रिकेटला अलविदा म्हणणारा डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन टी-२० संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. त्यांच्याशिवाय पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, पंत, स्टब्स, तर गोलंदाजीत अनुभवी इशांत शर्मा, मुकेश कुमार, कुलदीप यादव, अक्षर पटेलसह एनरिक नॉर्टजे यांचा समावेश आहे.

पंजाबला बेअर स्टोच्या फॉर्मची चिंता

राष्ट्रीय संघापासून दूर असलेल्या शिखर धवनकडे पंजाबच्या कर्णधारपदाची धुरा आहे. यष्टीरक्षक-फलंदाज जितेश शर्मा संघाचा नवा उपकर्णधार असेल. मात्र, भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत जॉनी बेअरस्टोचा खराब फॉर्म निश्चितच चिंतेचा विषय आहे. संघाकडे सिकंदर रझा, सॅम कुरन, लियामा लिव्हिंगस्टोन यांच्या रूपाने चांगले अष्टपैलू खेळाडू असले तरी. रबाडा, अर्शदीप, हर्षल पटेल यांच्या रूपाने त्यांची गोलंदाजीतही मारक क्षमता आहे.

यातून संघ निवडणार ?

पंजाब किंग्स संघ : शिखर धवन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, सिकंदर रझा, सॅम कुरान, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, शिवम सिंग, ख्रिस वोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, रिली रोसोव, हरप्रीत सिंग भाटिया, ऋषी धवन, शशांक सिंग, तनय त्यागराजन, आशुतोष शर्मा, अथर्व तायडे, विद्वथ कवेरप्पा, प्रिन्स चौधरी, विश्वनाथ सिंग.

दिल्ली कॅपिटल्स संघ : ऋषभ पंत (कर्णधार), शाई होप (विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, मुकेश कुमार, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, इशांत शर्मा, रिकी भुई, ऱ्हाय रिचर्डसन, प्रवीण दुबे, रसिक दार सलाम, जेक फ्रेझर-मॅकगुर्क, सुमित कुमार, कुमार कुशाग्रा, ट्रिस्टन स्टब्स, यश धुल, विकी ओस्तवाल, अभिषेक पोरेल, स्वस्तिक चिकारा.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT