Latest

RCB vs RR: कोहलीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, RCB चे टॉप-4 मध्ये पोहचण्याचे समीकरण बिघडले

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमध्ये 60 वा सामना आज (दि. 14) राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. आजचा सामना जो संघ हरेल त्याला पुनरागमन करणे फार कठीण जाईल. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना हा लढत कोणत्याही किंमतीत जिंकायची आहे. राजस्थानमधील जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. पण हा सामना जरी आरसीबीने जिंकला तरी त्यांचा संघ सध्यातरी टॉप 4 मध्ये स्थान मिळवू शकणार नाही. चला तर संपूर्ण समीकरण समजून घेऊ.

RCB साठी सध्या टॉप 4 चे दरवाजे बंद

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघ तुल्यबळ दिसत आहेत. आरसीबीचा (RCB) संघ सध्या 11 सामन्यांत 5 विजय आणि 6 पराभवांसह गुणतालिकेत 7व्या स्थानावर आहे. त्याच वेळी, आरआरचा संघ 12 सामन्यांत 6 विजय आणि 6 पराभवांसह पाचव्या क्रमांकावर आहे. गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या संघाचे यंदाच्या मोसमात 13 गुण आहेत. जर आरआरने हा सामना जिंकला तर त्यांच्या संघाचे 14 गुण होतील आणि ते चौथ्या स्थानावर पोहोचतील. दुसरीकडे, जर आरसीबीने हा सामना जिंकला, तर त्यांचा संघ इच्छा असूनही चौथ्या स्थानावर पोहोचू शकणार नाही कारण त्यांच्या संघाचे केवळ 12 गुण असतील. अशा स्थितीत आजचा सामना जिंकूनही आरसीबीला चौथ्या क्रमांकावर पोहोचता येणार नाही.

पराभवाची हॅट्ट्रिक टाळली पाहिजे

या सामन्यात आरसीबीला (RCB) कोणत्याही परिस्थितीत पराभवाची हॅट्ट्रिक टाळावी लागणार आहे. संघातील काही खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, मात्र दरवर्षीप्रमाणे त्यांची गोलंदाजी कमकुवत दिसत आहे. त्याचबरोबर मधल्या फळीलाही महत्त्वाच्या प्रसंगी योग्य कामगिरी करता येत नाही. गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, मोहम्मद सिराजशिवाय कोणताही गोलंदाज चमकदार कामगिरी करू शकत नाही. हर्षल पटेल निराशा करत आहे. अशा स्थितीत संघाने याकडे लक्ष देणे गरज आहे. दिनेश कार्तिकलाही मधल्या फळीत टिकाव धरता आलेला नाही. संघाची सुरुवात चांगली झाली तर त्यांना ही लय शेवटपर्यंत कायम राखता येत नाही. त्यामुळे लीगमध्ये अजूनही चांगली कामगिरी करायची असेल तर त्यांना या गोष्टींमध्ये सुधारणा करावी लागेल.

RCB चा संघ

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, केदार जाधव, विजयकुमार वैशाक, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, आकाश दीप, कर्ण शर्मा, फिन अॅलन, अनुज रावत, मायकेल ब्रेसवेल, सिद्धार्थ कौल, सोनू यादव, मनोज भंडगे, वेन पारनेल, राजन कुमार, अविनाश सिंग, हिमांशू शर्मा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT