पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२३ च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव केला आणि अंमित फेरीत धडक मारली. या सामन्यात महेंद्रसिंग धोनी चेन्नईचे नेतृत्व करत होता. दरम्यान, या सामन्यादरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. धोनीने पंचाशी ५ मिनीटे वाद घालत सामना रोखला, याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. धोनीने सामना थांबवण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही एकदा त्याने सामना थांबवत पंचाशी वाद घातला होता. (IPL 2023)
कर्णधार धोनीने गुजरातचा संघ फलंदाजी करत असताना १५ व्या षटकानंतर मथीशा पथीराना यास गोलंदाजी करण्यासाठी बोलावले. मात्र, पंचांनी पथीरानाला गोलंदाजी करण्यापासून रोखले. यावेळी धोनीने पंचाला पथीरानाला रोखण्याचे कारण विचारले. तेव्हा पंचांनी सांगितले की, पथिराना मैदानातून काही वेळापासून बाहेर गेला होता. त्यामुळे त्याला तेवढाच वेळ मैदानात घालवावा लागेल. दरम्यान, महेंद्रसिंग धोनीने या बाबत ४ मिनीटे पंचांशी वाद घातला. (IPL 2023)
जेव्हा पथीरानाने काही वेळ मैदानावर घालवला. तेव्हा धोनीने पुन्हा एकदा पथीरानाला गोलंदाजीसाठी बोलावले. जेव्हा धोनी पंचांशी याबाबत बोलत होता. तेव्हा तो रागात बोलत नव्हता. त्याने हे एका रणनिती प्रमाणे केले. धोनीची ही हुशारी ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूला देखील आवडली आहे. हॉगने याबाबत पंचांवर टीका केली आहे, त्याने याबाबत एक ट्वीट केले आहे. (IPL 2023)
हॉगने ट्वीट करत म्हटले की, धोनीने पंचांनी ४ मिनीटे रोखत चांगल्या प्रकारे काम केले. त्याने पंचांना ४ मिनीटे व्यस्त ठेवले. त्यामुळे विश्रांतीसाठी मैदानातून बाहेर गेलेल्या पाथीरानाला गोलंदाजी करण्यासाठी वेळ मिळाला. आता क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू यावर व्यक्त होताना दिसत आहेत. सोशल मीडियावर या घटनेची तुफान चर्चा होत आहे. दरम्यान, या सामन्यात विजय मिळवत चेन्नईने आयपीएल २०२३ च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. (IPL 2023)