Latest

MI vs CSK : अन् जडेजा बेस्ट फिनिशर धोनीसमोर झुकला, तर रैना म्हणाला…

backup backup

पुढारी ऑनलाईन डेेस्क : आयपीएलच्या सध्या सुरू असलेल्या १५ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सची अंकतालिकेत स्थिती खराब आहे. दोन्ही संघ अनुक्रमे ९ व्या आणि १० व्या स्थानावर आहेत. आयपीएल २०२२ मध्ये मुंबईला सलग सहा सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर चेन्नईविरोधात विजय मिळवण्यासाठी मुंबईचा संघ काल गुरुवारी मैदानात उतरला होता. पण महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या चार चेंडूमध्ये १६ धावा काढत मुंबईचा धुव्वा उडवला. (IPL 2022 MI vs CSK)

धोनीला बेस्ट फिनिशर म्हणून जगभर ओळखले जाते. धोनीने शेवटच्या चेंडूवर चौकार लगावत विजय खेचून आणला. धोनीने विजय खेचून आणल्यानंतर जडेजाने धोनीसमोर झुकत त्याने केलेल्या खेळाचा आदर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. सामना संपल्यानंतर धोनी मैदानावरून परतत असताना, चेन्नईचा कर्णधार जडेजा तिथे आला आणि धोनी समोर झुकून त्याने सॅल्यूट केला. धोनीने नाबाद राहत १३ चेंडूमध्ये २८ धावांची दमदार खेळी केली. (IPL 2022 MI vs CSK)

सुरेश रैनाने देखील धोनी-जडेजाचा व्हायरल होत असलेल्या फोटोबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई-चेन्नई सामन्यांची आतुरतेने वाट पाहत होतो. धोनीची खेळी अतिशय गरजेची होती आणि ती पाहून फार आनंद झाला असे, सुरेश रैना म्हणाला आहे. रविंद्र जडेजाने सामन्यानंतर सांगितले की, मी सामन्या दरम्यान निराश होतो. पण आम्हाला माहिती होते की, धोनी क्रिजवर आहे आणि तोच मॅच फिनीश करेल.

मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने चेन्नईसमोर १५६ धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबई आणि चेन्नई दरम्यान झालेल्या हा सामना हा अतिशय चित्तथरारक झाला. अखेरच्या चेंडूवर धोनीने चौकार लगावत विजय खेचून आणला. (IPL 2022 MI vs CSK)

हेही वाचलतं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT