आंतरराष्ट्रीय

व्हॅलेंटाईन विक – डे2- प्रपोज डे

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क :

सध्या व्हॅलेंटाईन विक सुरू आहे. काल म्हणजे 7-8-2022 ला व्हॅलेंटाईन विकची सुरूवात रोज डेनी झाली. या दिवशी मुलं-मुली एकमेंकाना गुलाबाचे फुल देऊन एकेमेकाप्रती असलेले प्रेम व्यक्त करतात. व्हॅलेंटाईन विक दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आठ फेब्रुवारीला प्रपोज डे साजरा केला जातो. या दिवशी मुले-मुली आपल्या आवडीच्या व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारे प्रपोज करतात. अर्थात आपल्या मनातील भावना त्या व्यक्तीसमोर व्यक्त करतात. आजचा दिवस मुलां-मुलींसाठी महत्वाचा असतो. कारण, आजच्या दिवशी ते आपल्या भावना एकमेकांसोबत शेअर करणार असतात.

आजच्या दिवशी काही मुलांचे प्रपोजल मुली स्विकारतात तर काही मुलांचे प्रपोजल नाकारले जाते. प्रपोजल नाकारण्याचे कारण वेगवेगळे असू शकते. जर तुम्ही हिंमत करून आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीला आजच्या खास दिवशी प्रपोज करणार असाल तर तुम्हच्यासाठी प्रपोज करण्याचे काही ट्रिक्स वापरू शकता.

प्रत्येक व्यक्तीला तिच्या-त्याच्या जोडीदारानेरोमँटिक पद्धतीने प्रपोज करावे अस वाटत असते. जर तुम्हालाही आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल भावना असतील आणि समोरच्या व्यक्तीने तुम्हाला रोमँटिक पद्धतीने प्रपोज केले तर ते रिजेक्ट करु नये, पण त्याचा विचार केला पाहिजे. तुम्हालाही एखाद्याला प्रपोज करायचे असेल तर तो रोमँटिक असावा. यासाठी तुम्ही छान फुले सोबत देऊन प्रपोज करू शकता. थेट I Love You म्हणण्याऐवजी तुम्ही काही रोमँटिक कविता किंवा शायरी वापरू शकता. याशिवाय कॅफे किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन तुम्ही तिला प्रपोज करू शकता.

आवडत्या ठिकाणी फिरायला जाणे.

काही लोक भीतीने त्या व्यक्तीला समोरासमोर भेटून प्रपोज करण्याएेवजी मोबाईलवरून मेसेज किंवा फोनकरून आपल्या भावना व्यक्त करतात अशा वेळी समोरून नकार येण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीला भेटून आपल्या भावना सांगितलेलं कधीही चांगल राहिल.

ज्या व्यक्तीला तुम्ही प्रपोज करणार आहात त्या व्यक्तीच्या थोड्याफार आवडी-निवडी माहित असतातचं. किंवा त्या माहित असण महत्वाच असतं त्या व्यत्कीच्या आवडत्या ठिकाणी फिरायला नेऊ शकता ते ठिकाण रोमँटिक असाव तेथे थोडा काळ घालवल्यानंतर प्रिय व्यक्तीच्या मनाचा अंदाज घेऊन आपण आपल्या मनातील भावना व्यक्त करू शकता.

ऑनलाइन प्रपोज

जर तुम्ही कोरोनामुळे घर सोडू शकत नसाल, तुमच्या आवडत्या व्यक्तीला भेटू शकाल, तर आता
शेवटचा पर्याय म्हणजे आजच्या काळातील साधने वापरून ऑनलाईन पध्दतीन त्या व्यक्तील आपल्या भावना सांगू शकता. ऑनलाईन पद्धतीने आपल्या भावना सांगताना आपण व्हिडीओचा वापर करून तुम्ही आपल्या भावना शेअर करू शकता. त्यासोबतचं तुम्ही आपला आवाज रेकॉर्ड करून आपल्या प्रेम व्यक्त करू शकता.

प्रेम पत्र लिहा

होय,आजच्या काळात पत्र लिहून तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्या भावना सांगू शकता. त्या पत्रामध्ये भावना व्यक्त करताना तुम्ही कविता किंवा शायरी यांचा वापर करू शकता. त्यासोबत एक छान असा फुलांचा पुष्पगुच्छ देऊ शकता.

SCROLL FOR NEXT