अमेरिकेतील श्रीमंत भागांत रात्री का पसरतो अंधार? भारतीय महिलेने सांगितले कारण file photo
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेतील श्रीमंत भागांत रात्री का पसरतो अंधार? भारतीय महिलेने सांगितले कारण

अमेरिकेच्या या पॉश परिसरांमध्ये विजेची कोणतीही कमतरता नाही, तरीही लाईट्स का लावत नाहीत? जाणून घ्या कारण..

पुढारी वृत्तसेवा

Why is it dark at night in wealthy areas of America? An Indian woman explains the reason

पुढारी ऑनलाईन : Street Lights In American Posh Areas : अमेरिकेत रात्रीच्या वेळी अनेक भागांमध्ये अंधार असतो. या भागांमध्ये रस्त्यावरील दिवेही लावले जात नाहीत. विशेष म्हणजे, तिथे विजेची कोणतीही कमतरता नाही. मग असे का केले जाते? यामागचे कारण शिकागोमध्ये राहणाऱ्या एका भारतीय महिलेने सांगितले आहे. तिने रात्रीच्या वेळेचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अमेरिका हा प्रत्येक बाबतीत इतर देशांपेक्षा प्रगत मानला जाणारा देश आहे. मात्र, तरीही येथील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये रात्रीच्या वेळी अंधार असतो. या अंधारातही लोक ये-जा करताना दिसतात. रस्त्यांवरील दिवे सुरू असले तरी त्यांचा प्रकाशही खूप कमी असतो. तिथल्या नागरिकांसाठी ही सामान्य बाब आहे. मात्र, भारतीयांना याबाबत प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. कारण भारतात प्रत्येक गल्लीबोळात अंधार पडल्यानंतर रस्त्यावरील दिवे सुरू होणे आवश्यक मानले जाते.

विकसित देशात असे का घडते?

'Chillout_1588_usa' या प्रोफाइलवरून स्वाती अग्रवाल गुप्ता यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये शिकागोमधील अंधारात असलेल्या एका उच्चभ्रू निवासी परिसराची झलक पाहायला मिळते. यासोबतच विकसित देशात असे का घडते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

डार्क स्काय मूव्हमेंट

त्या सांगतात की, येथे गरज नसेल तर बाहेरील दिवे बंदच ठेवले जातात. तसेच घराबाहेरील दिव्यांसाठी मोशन सेन्सर आणि खालील दिशेने प्रकाश टाकणाऱ्या शिल्डेड लाइट्सचा वापर केला जातो. त्यामुळे प्रकाश योग्य दिशेने आणि आवश्यकतेनुसारच वापरला जातो. यामागे 'डार्क स्काय मूव्हमेंट' ही संकल्पना आहे.

प्रकाश प्रदूषण कमी करणे हा उद्देश

डार्क स्काय मूव्हमेंटचा मुख्य उद्देश प्रकाश प्रदूषण कमी करणे हा आहे. कृत्रिम प्रकाशामुळे केवळ विजेचा अपव्यय होत नाही, तर शरीराच्या नैसर्गिक जैविक घड्याळावर म्हणजेच सर्केडियन रिदमवरही परिणाम होतो. याचा पक्षी आणि प्राण्यांवरही परिणाम होतो. अनावश्यक दिवे सुरू ठेवल्यामुळे तारे आणि आकाशगंगा (मिल्की वे) यांसारखी नैसर्गिक दृश्येही पाहता येत नाहीत.

हा व्हिडिओ पाहणारे भारतीय नागरिक मात्र भारतातील विजेच्या समस्येची आठवण काढत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले, 'भारतात ही पद्धत कधीपासून पाळली जात आहे? कारण इथे तर वीजच येत नाही.' दुसऱ्या युजरने लिहिले, 'म्हणूनच अमेरिका हा विकसित देश आहे.' तर आणखी एका युजरने म्हटले, 'एक दिवस भारतही ही गोष्ट शिकेल.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT